पवनार ग्रामपंचायत तर्फे नितीन गडकरी यांना तुळजापूर नागपूर हायवे वरील अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी दिले निवेदन
सतीश अवचट/ पवनार :
ग्रामपंचायत पवनार कडून नितीन गडकरी केंद्रीय सडक परीवहन व राज्य मार्ग,सुक्ष्म तथा मध्यम उद्योग मंत्री यांना बुटीबोरी तुळजापुर हायवेवरील पवनार येथील राहिलेले अर्धवट कामे पुर्ण करण्याबाबत पवनार ग्रामपंचायत प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. पवनार येथील बुटीबोरी – तुळजापुर हायवे वरील पवनार गावामध्ये झालेले कामे अर्धवट परीस्थीतीत आहे त्यात हायवेवरील गोमासे ते पुलापर्यंत स्ट्रिट लाईट लावणे . बस स्टॉप वरील दोन्ही बाजुने पक्या नालीचे बांधकाम करणे . हायवे क्रॉसिंग पवनार चौकात चांगल्या प्रतीचे रिफ्लेक्टर लाईट , लावणे . पवनार जुन्या वस्तीत जानारा ऑप्रोच रोडची रूंदी वाढवुन देणे . नदीवरील पुलाखालील रॉ मटेरीयल काढुन नदी साफ करून देणे . इत्यादी कामे अपुर्ण परीस्थीतीत असुन मागील 2 वर्ष पासून ही कामे अर्धवट स्थितीत आहे.ती कामे कामे पूर्ण करून देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत पवनार कडून निवेदन देण्यात आले तसेच त्यांचे गावात आगमन होताच भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पवनार ग्रामपंचायतच्या सरपंच
शालीनी आदमणे. राहुल पाटणकर, शारदा वाघमारे, सविता पेटकर, मुनिश्वर ठाकरे, प्रशांत सावरकर ,नलिनी ठोंबरे, गिता इखार, अनिता काळबांडे, राजेंद्र बावणे,मंगला राजेंद्र कुत्तरमारे, जयश्री आदमणे, शकुंतला नगराळे, रोशनी सतिश अवचट,प्रमोद सरोदे,वरूड ग्रामपंचायत च्या सरपंच सुनीता ढवळे, नितीन कवाडे तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.