पवनार येथील पादन रस्त्याची उपविभागीय अधिकाऱ्यानी केली पाहणी

0

पवनार / बाजीराव हिवरे :

ग्रामीण भागात वहिवाटी साठी पांदन रस्त्याचे अन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची कामे हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी केली होती. त्याप्रमाणे पांदन रस्ते मोकळे करण्याच्या कामास वर्धा जिल्ह्यात सुरवात झाली आहे. वर्धा तालुक्यातील पवनार येथील मौजा पवनार ते मौजा केदारवाडी या दोन मौजाना जोडणाऱ्या केदोबा ची पादन या नावाने प्रचलित असलेल्या पांदण रस्त्याची उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी आज दि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रत्येक्ष पाहणी करून, लगेज दिनाक २० नोव्हेंबर २०२१ रोजी मंडळ अधिकारी देशमुख व तलाठी सहारे यांना पांदन रस्त्याचे मोजमाप करून, सोमवार दि.२२/११/२०२१ पासून दोन जेसीबी मशीन द्वारे लोकसहभागातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना तहसीलदार रमेश कोळपे यांना प्रत्यक्ष मोक्का पाहणीच्या वेळी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, नायब तहसीलदार बाळु भागवत, मंडळधिकारी शैलेश देशमुख, राजेश झांबरे, तलाठी आशिष सहारे, यशवंत लडके ,बाळप्रसाद ढोणे, मधुकर गेडाम, मीनाक्षी उईके, भाग्यश्री लुटे, पूजा तळवेकर, अर्चना गिरडकर मुरलीधर लवनकर, तसेच पवनार येथील उपस्थित शेतकरी बांधव निळकंठ हिवरे अनिल आंबटकर, सुरेश पाटील, गणपत हिंगे रोमहर्ष हिवरे, दिलीप वैद्य रंजना आंबटकर, राजेंद्र हिवरे सचिन उराडे, दामोदर हिवरे, सुरज वैद्य, किशोर गोमासे, व इतर असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!