पहा हिंगणघाट शहरातील टाका ग्राउंड जवळील वॉटर फिल्टर प्लांटची ही आहे अवस्था

0

इक्बाल पैलवान / हिंगणघाट :

शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत नव्याने उभारण्यात जलशुद्धिकरण कुंभ कार्यान्वित करण्यासाठी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता पालिकेच्या जुन्या जलशुद्धिकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचुन असल्याचे निदर्शनास आले असून पालिकेच्या जलप्रदाय विभागाचा गलथान कारभार उघडकिस आला आहे.
आज जुन्या जलकेंद्राला नवनिर्मित जलकेंद्राची जोडणी करण्याचे काम करीत असतांना उपरोक्त बाब निदर्शनास आली,या जोडणीच्या कामासाठी शहरातील नळ योजनेचा पाणीपुरवठा गेल्या २ दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे.
उद्या दि.२३ पासून शहरात पाणीपुरवठा पूर्वतत सुरु होणार असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली असून जनतेला मात्र पाणीटंचाईचा
मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.
जुन्या जलशुद्धिकरण केंद्रात साचलेला गाळ नष्ट करण्यासाठी क्लेरिफ्लोक्युलेटरमधे यंत्रणा अस्तित्वात आहे,परंतु याकडे पालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने या कुंभात जवळपास ४ फुटाचेवर चिखल साचलेला आहे,आता हा गाळ स्वच्छ करण्याची जबाबदारी पालिकेवर येऊन पडली आहे.
आज नवीन जलशुद्धिकरण केंद्राची तसेच जुन्या जलशुद्धिकरण केंद्रासोबत जोडणीच्या कामाची पाहणी करण्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता चंद्रिकापूरे यांनी भेट दिली असता सदर प्रकार उघडकिस आला.
चन्द्रिकापुरे यांना विचारणा केली असता त्यांनी हा पालिकेच्या जलप्रदाय विभागाशी संबंधित असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली, वास्तविक पहाता नवीन जलशुद्धिकरण केंद्राची जुन्या जलशुद्धिकरण केंद्राशी जोडणी करतांना ही जीवन प्राधिकरण विभागाची सुद्धा जबाबदारी आहे.

अधिकाऱ्यांचे मोबाईल नॉटरिचेबल

यासंदर्भात आमच्या प्रतीनिधीने पालिकेच्या जलप्रदाय विभागाचे अभियंता दिनेश तपासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!