पाऊण कोटीच्या दरोड्याचा तपास घेण्यास एलसीबीचा नकार,यवतमाळ एलसीबीत केवळ वसुलीचे साम्राज्य?यवतमाळ-एलसीबी-वसुली-दरोडा-तपास-गंभीर-आरोप

0

🔥यवतमाळ चे जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता सतीश चवरे नां अभय देऊन पाऊण कोटीच्या दरोड्याचा तपास घेण्यास एलसीबी पथकांना नकार देत आहे.🔥हेच ते सतिश चवरे यवतमाळ एलसीबीत केवळ वसुलीचे साम्राज्य?करून यवतमाळ-एलसीबी-वसुली-दरोडा-तपास-गंभीर-आरोप

​यवतमाळ -/ जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असतानाच, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी कटिबद्ध असणारी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नेमकी काय काम करत आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहादा येथे घडलेल्या तब्बल पाऊण कोटींच्या दरोड्यासारख्या अतिअतिसंवेदनशील गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेण्यास एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी थेट नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे ‘यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा केवळ वसुलीसाठीच नेमली आहे का?’ असा थेट आणि आक्रमक सवाल आता पोलीस दलाच्या वर्तुळात तसेच सर्वसामान्य जनतेत उपस्थित केला जात आहे. ​पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहादा येथील रहिवासी राजेंद्र श्रीमल वर्मा (६१, रा. मशिद वॉर्ड) यांच्या घराला लागूनच असलेल्या दुकानात १५ जुलै रोजी पहाटे ४.०५ ते ४.२५ च्या सुमारास भयंकर दरोडा पडला. तोंडावर काळे-निळे मास्क आणि हातात हातमोजे घातलेल्या सराईत अज्ञात दरोडेखोरांनी केवळ २० मिनिटांत ही कोट्यवधींची घरफोडी केली. वर्मा यांच्या दुकानातून ६०० ते ६५० ग्रॅम सोन्याचे दागिने, २८ ते ३० किलो चांदीचे दागिने (ज्याची एकूण किंमत तब्बल ९६ लाख रुपये आहे) आणि दीड लाख रुपयांची रोकड असा सुमारे पाऊण कोटींपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला.

​पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरून गेला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित ठाणेदाराने हा गंभीर गुन्हा पुढील तपासासाठी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग केला होता. ​एकीकडे जिल्ह्यात एवढा मोठा दरोडा पडलेला असताना, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी एलसीबीचे प्रमुख पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी मात्र आपले हात वर केले आहेत. पांढरकवडा ठाणेदाराने गुन्हा वर्ग केल्यानंतर, “तुम्हीच या गुन्ह्याचा तपास करा आणि गुन्हा उघडकीस आणा,” असे अत्यंत बेजबाबदार आणि उलट उत्तर पीआय चवरे यांनी दिल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​मोठमोठ्या गुन्ह्यांची पाळेमुळे खणून काढणे आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करणे ही एलसीबीची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र, दरोड्यासारख्या कठीण गुन्ह्यात स्वतःचा कस लागेल, तपासात अपयश आले तर आपल्यावर बोट ठेवले जाईल आणि आपली उघडीप पडेल, या भीतीपोटीच चवरे यांनी हा गुन्हा परत ढकलल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून पीआय सतीश चवरे यांच्या कामाची तथाकथित ‘स्किल’ आणि कार्यशैली उघडी पडली आहे.

​स्थानिक गुन्हे शाखेचा रोख गुन्हेगारी मोडून काढण्याऐवजी अवैध धंद्यांकडून ‘हप्ते’ वसूल करण्यावरच जास्त असल्याचा गंभीर आरोप होत आहे. वणी आणि पांढरकवडा उपविभागासाठी एलसीबीतील कर्मचारी सुधीर पांडे यांच्याकडे विशेष ‘वसुली’चे काम सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

​या भागातील अवैध व्यावसायिक, मटका, दारू विक्रेते आणि जुगार क्लब चालकांनी जर एलसीबीला ठरलेली ‘चिरिमिरी’ (हप्ता) दिली नाही, तरच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, जे नियमित हप्ते भरतात, त्यांना अभय दिले जाते. त्यामुळे एलसीबी ही गुन्हे शोधणारी यंत्रणा राहिली नसून केवळ ‘हप्ता वसुली केंद्र’ बनली आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ​एलसीबीचे पीआय सतीश चवरे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यवतमाळ एलसीबीमध्ये असताना पीआय चवरे यांनी तब्बल १२ लाख रुपयांची ‘डील’ करून ‘मोक्का’ सारख्या गंभीर कायद्याखालील आरोपीला सोडल्याची तुफान चर्चा आहे. एकीकडे मोठ्या रकमेची देवाणघेवाण करून गंभीर गुन्हेगारांना मोकळे सोडायचे आणि दुसरीकडे दरोड्यासारख्या क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करायला भीती वाटून तो गुन्हा मूळ ठाण्याकडे परत पाठवायचा, असा प्रकार सध्या एलसीबीमध्ये सुरू आहे.

​जिल्ह्यात एवढा मोठा दरोडा पडतो, स्थानिक गुन्हे शाखा तपास घेण्यास नकार देते आणि हप्तेखोरीचे खुलेआम आरोप होतात; तरीही जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) या संपूर्ण प्रकरणावर गप्प का आहेत? पोलीस दलातील या भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभारावर ते नेमकी काय कारवाई करणार? की ते केवळ ‘बघ्याची भूमिका’ घेणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​एकीकडे दरोड्यामुळे मोहादा परिसरातील नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत, तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा आपापसातील जबाबदाऱ्या ढकलण्यात आणि वसुलीत व्यस्त आहे. या सर्व प्रकारामुळे यवतमाळ पोलीस दलाची प्रतिमा प्रचंड मलीन झाली असून, आता या प्रकरणी गृह मंत्रालयानेच थेट दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.(क्रमशः)

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!