पियुष’ च्या अचानक निधनामुळे संपूर्ण वायगाव शोकमग्न
Byसहासिक न्युज 24
प्रमोद पानबुडे/वर्धा :
हृदयाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या एका १५ वर्षीय मुलाच्या निधनाचे वृत्त कळताच वडिलाला धक्काच बसला…! ही हृदय हेलावणारी घटना वर्धा जिल्ह्यातील वायगाव (निपाणी) येथे घडली.
वायगाव येथील पियुष लक्ष्मणराव घोडे वय १५ वर्ष हा हृदयाच्या आजाराने ग्रस्त होता. त्यांच्यावर वर्धा येथील सावंगी मेघेच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शुक्रवारी २९ जुलैला काळाने झडप घातली व त्याची प्राणज्योत मावळली . ‘पियुष ‘च्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव वायगाव (निपाणी) येथे जन्मगावी आणले. मात्र ते पाहून गावकरी सुन्न झाले.
तर दुसरीकडे त्याच्या अचानक जग सोडून जाण्याने नातेवाईकांसह गावकरीही भारावले. ‘पियुष ‘चा अंत्यसंस्कार पार पाडून गावकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील नातेवाईक घरी परतले. पण या घटनेमुळे गावात स्मशान शांतता पसरली होती. व नातेवाईकांसह संपूर्ण गाव शोकमग्न झाले.