पुलगावच्या तेजस्विनीची दुर्धर आजाराशी झुंज. तिला मदतीची गरज…..

0

पुलगाव -/ पंचधारा रोड, जिजामाता कॉलोनी, वार्ड ३ येथील रहिवासी तेजस्विनी प्रभाकर भोयर, वय १९ वर्ष असून घरची अगदी हालाखीची परिस्थिती आहे.वडील हातमजुरी करता करता एका अपघाताने पायाला इजा झाली व वडील घरी स्थानबध्द झाले.तसेच तेजस्विनीची आई सुद्धा मोलमजुरीला जाऊन आपले घराचे उदरनिर्वाह करत होती.व कालांतराने त्यांचा हि काम करता करता अपघात झाला व त्या हि शारीरिक दृष्ट्‍या कमजोर झाल्या आणि त्यांना सुद्धा घरी स्थानबध्द व्हावे लागले.आईची तब्बेत सुद्धा चांगली राहत नसून वारंवार दवाखान्यात इलाज सुरु राहतो.अश्यात तेजस्विनीची मोठी बहिण मनस्वी हि अवघ्या २१ वर्षाची हिच्यावर स्वतःच्या शिक्षणासह घरची आई, वडील, व लहान बहिणीची जबाबदारी आली.व तिला लहान बहिणी विषयी फार प्रेम असल्याने मनस्वी शिक्षण करून बाहेर लहान मोठी नौकरी करून आपल्या बहिणीवर उपचार करण्या करिता पैशाची जुळवाजुळाव करत राहते.परंतु या परीस्थितीत मनस्वीला अनेक नौकऱ्या सोडाव्या लागल्या कारण तिला दवाखान्यात, घरात, व तिघांच्या सेवेत वेळ द्यावा लागत असल्याने नौकरी करिता सुद्धा वेळ पुरत नव्हता व अनेक दिवस सुट्ट्या घ्याव्या लागत होत्या. अश्यात अनेक मालकांनी तिला वेळे अभावी व सुट्ट्यामुळे नौकरी वरून मुक्त केले जात होते.अश्या हालाखीच्या परिस्थितीत मनस्वी आपल्या लहान बहिणीच्या आजारावर मात मिळवण्यासाठी आर्थिक परिस्थितीची जुळवाजुळव करत आहे.
मनस्वी आपल्या लहान बहिणी करिता तिच्या दुर्धर आजाराला लागत असलेला खर्च हा जवळपास लाखोच्या रुपयाच्या घरात आहे.यात शासनाकडून सुद्धा सहकार्य जास्त प्रमाणात झाले नाही.शासन दरबारी या आजारावर आर्थिक सहकार्य झाले नाही.मनस्वी वर्धा जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या दरबारी गेली असता तिथे सुद्धा तिला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही.इतकेच नव्हे तर अमरावती भागातील सुद्धा आमदारांशी संपर्क साधला असता तिला कुठलेच यश आले नाही.तेजस्विनी ला बोन म्यारो हा आजार झाला आहे.हा आजार फार कमी प्रमाणात लोकांना होतो.त्यात तेजस्विनीला हा आजार वर्ष २०२३ ला झाला.तेव्हा पासून तेजस्विनी आपल्या हालाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपले साधारण दवाखान्यात उपचार घेत आहे.सर्वप्रथम तेजस्विनी सेवाग्राम च्या दवाखान्यात दाखल झाली.तिला तेथून त्या आजारावर मात करण्या करिता नागपूर येथे शासकीय रुग्णालयात स्थलांतरित केले.तेथे सुद्धा तिच्या आजारावर उपचार होऊशकले नसल्याने नागपूरच्या एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले.तेथे थोडाफार उपचार करण्यात आला व तेथील डॉक्टरांनी तिला मुंबई येथे उपचार दरम्यान जाण्यास म्हटले. तेजस्विनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईत सुद्धा हिंदुजा इस्पितळात दाखल झाली.परंतु तेथील उपचाराचा खर्च हा झेपन्या सारखा नव्हता.तेथील एकूण अंदाजित खर्च हा ४५ लाख रुपये इतका आहे. व त्या मुळे त्या आजारावर उपचार अशक्य ठरला. आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने तेजस्विनी वरील उपचार हे आता कठीण होत चालले आहे.
तरी सुद्धा आता तेजस्विनीला रक्ताच्या उलट्या सुद्धा सुरु झाल्या आहे व अश्या परिस्थितीत तिला दवाखान्यात दाखल करण्याची गरज जास्त प्रमाणात आहे.तिला नागपूर येथे प्राथमिक उपचाराकरिता न्यायचे असून मनस्वी आपल्या लहान बहिणी करिता आर्थिक परिस्थितीची जुळवाजुळव करत आहे.परंतु पैसा जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नसल्याने तिने जनते समोर मदतीचा हात समोर केला आहे.तरी या दैनिक साहसिक news -24 वृत्तपत्राच्या माध्यमातून मनस्वीला सहकार्य म्हणून तिची हकीकत आपल्या पर्यंत पोहचवण्याचे कार्य करीत आहे.ज्या हि व्यक्तीला तिची मदत,आर्थिक सहकार्य करण्यास इच्छुक असाल त्यांनी मनस्वीच्या बँक खात्यात आपल्या कडून जितके सहकार्य होईल तितके करून पुलगावच्या तेजस्विनीला सहकार्य करून ईश्वरचरणी प्रार्थना करावी की, तेजस्विनीची प्रकृती चांगली होवो. तेजस्विनीला सहकार्य करण्याकरीता तिच्या मोठ्या बहिणीच्या मनस्वी प्रभाकर भोयर हिच्या खाली दिलेल्या बँक खात्यात आर्थिक सहकार्य करावे.
खाते धारकाचे नाव:- मनस्वी प्रभाकर भोयर
बँकेचे नाव :- भारतीय स्टेट बँक शाखा पुलगाव.
आय एफ एस सी नं. :- SBIN0001415
खाते क्र. :- 33217467840
मोबाईल नं. 7218089946 (फोन पें. व गुगल पें)

सागर झोरे साहसिक news-/24 पुलगाव 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!