पुलगावात सीआरपीएफ मधून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे गावकऱ्यांनी केले भव्य स्वागत
प्रतिनिधी / पुलगाव :
स्थानिक तीलक नगर रहिवासी ललित उत्तम मुरकुटे हे सी आर पी एफ मधून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त होऊन जन्मभूमी पुलंगाव येथे आले पुलगाव रेल्वे स्टेशन चौक ते तिलक नगर पर्यंत गावकऱ्यांनी मिरवणूक काढून बैन्ड फटाके आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात पुलंगावकरानी तुमचे स्वागत करीत अभिनंदन केले ,
त्यावेळी सी आर सी आर पी एफ चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते . ललित मुरकुटे हे सन 2001 मध्ये सी आर पी एफ ला यांची रिजनल पोलीस बल मध्ये नियुक्ती झाली, 28 फेब्रुवारी 2022 रोजी अहमदाबाद येथे सेवारत असताना सेवानिवृत्त झाले . उपस्थित अधिकारी ने पुष्पहार देऊन निरोप देण्यात आला . ललित मुरकुटे यांनी आपली सेवा जम्मू काश्मीर,आसाम, छत्तीसगड मधे बिजापूर, मुंबई, मानेसर, अहमदाबाद नवजिवन एक्स्प्रेस ला थांबून रेल्वे स्टेशन मधे अभिनंदन करण्यात आले . त्यावेळी ललित मुरकुटे त्यासोबत त्यांच्या त्यांची पत्नी शुभांगी मुरकुटे सबोत होती व घरी आई भाऊ पुर्ण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी दिनेश येडांगे, स्वप्नील ढोमणे ,आशिष गांधी, रवि केशरवानी,पवन मारोठीया, मंगेश बिरे,गौरव दांडेकर,विजय ढोमणे गौरव अरोरा,शुभम चव्हाण, सतिश जयसिगपुरे, निखिल गुल्हाने,रवि बाळापुरे, हेमंत मुरकुटे,जगदिश गावंडे, संदीप भोयर, शेंडे आदी उपस्थित होते.