पेट्रोल पंप हटाव कृती समिती च्या वतीने भीम टायगर सेनेचे साखळी उपोषण! जेल भरो आंदोलन करणार :- विशाल रामटेके !

0

प्रतिनिधी/ वर्धा :

सत्ताधारी आमदार,पालकमंत्री व भाजपचे विरोधी पक्षातील आमदार,खासदार यांचे धोरण जातीयवादाला प्रोत्साहन देणारे आहे.आंबेडकरी समाज व वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीचे आंदोलन गेल्या सहा महिन्या पासुन सुरू आहे.पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी प्रशासनाने अजूनपर्यंत डा.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळुन पोलिस वेल्फेअर च्या पेट्रोल पंप ची जागा स्थलांतरित केली नाही.सूडबुद्धीने व्देष करणाऱ्या राज्य व केंद्र सरकार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार,खासदार,पोलिस अधीक्षक जिल्हाधिकारी यांचा जाहीरपणे निषेध करुन भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पोलिस प्रशासन मालकीचा, (ज्वलनशील पदार्थ) हिंदुस्थान कंपनीच्या पेट्रोल पंप ची जागा त्वरित स्थलांतरित करावी.या मागणीचे निवेदन आज 02 फेब्रुवारी ला जिल्हाधिकारी यांना भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल रामटेके,रिपाइं (आंबेडकर) चे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर, सम्बुध्द महिला संघटनेच्या नेत्या शारदाताई झामरे, आंबेडकरी नेत्या वैशालीताई पाटील, नगरपालिका सदस्य परवेज खान, पद्माताई रामटेके,निलेश खोंड व वर्धा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या सदस्यां तर्फे देण्यात आले.

राज्य सरकार तसेच पालकमंत्री सुनिल केदार यांनी प्रशासनाला पेट्रोल पंप हटविण्याचे निर्देश द्यावे.रणजित कांबळे,डा.पंकज भोयर या स्थानिक आमदारांनी हिटलरशाहीला प्रोत्साहन न देता आंबेडकरी समाजाच्या सदरहु मागणीला न्याय देण्यास पुढे यावे.अन्यथा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंबेडकरी व पुरोगामी जनता लवकरच जेल भरो आंदोलन करेल,यातुन होणाऱ्या हाणीला जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार, खासदार व जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल.अशी प्रतिक्रिया उपोषणाला बसलेल्या भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके वर्धा तालुका प्रमुख विशाल नगराळे,आशिष जांभुळकर,सिद्धार्थ मेश्राम,अंकुश मुंजेवार,स्वप्नील गोटे, पंकज लभाने,सौरभ हातोले राजू शेजोळकर, पवन धवणे, विकी पाटील, अंकुश गजभिये संजय कांबळे अजय अवथरे नयन रामटेके धम्मा सेलकर आदींनी पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे साखळी उपोषण केले.आजचा साखळी उपोषणाचा 141 वा दिवस आहे.सदरहु भीम सैनिकांनी साखळी उपोषणातुन सरकार व जिल्हाधिकारी प्रशासनाचा तीव्रतेने निषेध केल्या गेला.

काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार,पालकमंत्री व भाजपचे विरोधी पक्षातील आमदार,खासदार यांचे धोरण जातीयवादाला प्रोत्साहन देणारे आहे.आंबेडकरी समाज व वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीचा,सूडबुद्धीने व्देष करणाऱ्या राज्य व केंद्र सरकार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार,खासदार जिल्हाधिकारी यांचा जाहीरपणे निषेध करुन भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पोलिस प्रशासन मालकीचा, (ज्वलनशील पदार्थ) हिंदुस्थान कंपनीच्या पेट्रोल पंप ची जागा त्वरित स्थलांतरित करावी.राज्य सरकार तसेच पालकमंत्री सुनिल केदार यांनी प्रशासनाला पेट्रोल पंप हटविण्याचे निर्देश द्यावे.रणजित कांबळे,डा.पंकज भोयर या स्थानिक आमदारांनी हिटलरशाहीला प्रोत्साहन न देता आंबेडकरी समाजाच्या सदरहु मागणीला न्याय देण्यास पुढे यावे.अन्यथा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंबेडकरी व पुरोगामी जनता लवकरच जेल भरो आंदोलन करेल,यातुन होणाऱ्या हाणीला जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार, खासदार व जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल.पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे साखळी उपोषण केले.आजचा साखळी उपोषणाचा 141 वा दिवस आहे.सदरहु भीम सैनिकांनी साखळी उपोषणातुन सरकार व जिल्हाधिकारी प्रशासनाचा तीव्रतेने निषेध केल्या गेला.कृती समितीच्या साखळी उपोषणाचा 141 वा दिवस असुनही राज्य सरकारला जाग आलेली नाही, त्यामुळे आजच्या साखळी उपोषणातुन कृती समितीच्या आंदोलकांनी प्रशासना विरोधात जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!