…पैशाच्या वादातून ‘भारत’ ने केला ‘मंदाचा’ खून
क्राईम प्रतिनिधी / वर्धा :
काढळी येथील मंदा भारत पुसनाके वय ४५ वर्ष या महिलेचा कुजलेलेल्या अवस्थेत मृतदेह तिच्या राहते घरी मिळून आला होता, त्यावरून पोलिस स्टेशन सिंधी( रेल्वे) येथे कलम 174 जा. फौ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला होता. च्या ठिकाणी मुतदेह आढळला त्या घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली. तसेच मृतदेहची सुद्धा पाहणी केली असता त्याना घातपाताचा संशय आल्याने पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यानी सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्याने व सदर गुन्ह्यात कोणताही तांत्रिक पुरावा नसल्याने घटनेची सखोल तपास करून सलग पंधरा दिवस पाठपुरवठा सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे व पोलिस उपनिरिक्षक सौरभ घरडे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात एलसीबी च्या पथकाने मुखबीरच्या गोपनीय माहिती च्या आधारे दिनांक ३० आक्टोबर रोजी मुतक मंदा व तिचा पती भारत यांच्यात वाद होऊन जोरदार भांडण झाले होते व तिचा पती हा त्या दिवसापासून गावात दिसला नाही यामुळे संशय बळावल्याने वायफड बेडा, पालोती, केळझर येथे शोध घेत असता आर्वी तालुक्यातील हरदोली येथील भारत पुसनाके याच भागातील जगलात असल्याची माहिती मिळाली यावरून
हुशारीने आरोपीस ताब्यात घेऊन त्यास पोलिसी हिसका दाखवताच त्याने त्याच्या पत्नी सोबत भांडण झाल्याने व पैशाच्या कारणावरून नेहमी होणाऱ्या वादला कंटाळून तिचा जागीच गळा दाबून खुन केल्याची कबुली दिली.त्यावरून आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी सिदी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हि सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर , अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत साळुंके , पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनात सपोनि महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे पोलीस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, यशवंत गोल्हार, रितेश शर्मा, विकास अवचट, संघसेन कांबळे, अभिजित वाघमारे, राकेश अष्टनकर व व सायबर पदकाचे अनुप कावळे यांनी केली