प्रत्येक व्यक्ती पर्यन्त शासनाच्या योजना पोहचल्याच पाहिजे:आ.समिर कुणावार

0

हिंगणघाट येथे शासन आपल्या दारी (समाधान शिबीराचे) आयोजन 1271 लाभार्थ्यांना लाभ

हिंगणघाट : केंद्र व राज्य शासनाच्या विविध समाज उपयोगी योजना या तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे माझे काम तसेच प्रत्येक व्यक्तीला हक्काची जागा व निवारा मिळावा हे एक कार्यकर्ता म्हणून माझे कर्तव्य आहे त्या करिता सतत प्रयत्नशील आहो प्रशासनाने सुध्दा सेवा भावनेतून काम करण्याची गरज असल्याचे मत कलोडे मंगल कार्यालया येथे तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित शासन आपल्या दारी या अंतर्गत समाधान शिबीरात आमदार समिरभाऊ कुणावार यांनी व्यक्त केले
. कलोडे मंगल कार्यालय हिंगणघाट येथे तालुका प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या दारी या अंतर्गत समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या समाधान शिबीराचे उद्घघाटक आमदार समिरभाऊ कुणावार होते तर शिबीराच्या अध्यक्षस्थानी उपविभागिय अधिकारी शिल्पा सोनूले,होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ,तहसिलदार सतीश मसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,, माजी सभापती गंगाधरराव कोल्हे , उपविभागीय कृषी अधिकारी रोगडे, गटविकास अधिकारी अंजने, सुनील डोंगरे, भूषण पिसे, विनोद विटाळे, शंकर मुंजेवार, नलिनी सयाम,दत्ता भांगे, रविला आखाडे , कृषी अधिकारी सुतार,नायब तहसीलदार कांबळे,आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून शिबीराचे उद्घाघाटन करण्यात आले.यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार कुणावार पुढे म्हणाले की. केंद्र व राज्य सरकारने तळागाळातील जनसामान्यांसाठी विविध लोकाभिमुख योजना आहे.मात्र यांचा पाहिजे तसा फायदा गोरगरीब लोकांना होत नाही या सर्व योजना गोरगरीब पर्यंत पोहोचविण्या करीता माझे कायम प्रयत्न असतो यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे यामुळेच आतापर्यंत हिंगणघाट – समुद्रपुर विधानसभा श्रेत्रातील साडेचार हजारांच्या वर अतिक्रमण धारकांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात यश मिळाले आहे तर पहिल्यांदा ज्याचे घरात पाणी केले त्यांना 5 हजार रु 86 लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे असे मत आमदार समिरभाऊ कुणावार यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे शिंदे -फडणविस सरकारने शेतकऱ्यांना दिवसा 12तास कृषी पंपाना विद्युत पुरवठा देणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना देत सरकाराचे आभार मानले यावेळी त्याच्या हस्ते 70 लाभार्थ्यांना सनद, वनविभागामार्फत गॅस कनेक्शन व इतर योजनेतील 87, , कृषि विभाग 270, पंचायत समिती सिंचन विहरि व गोठा बांधकाम व इतर योजनेतील लाभार्थी 225, महसूल विभागाचे निराधार,आपसी वाटणी पत्र अंत्योदय योजनेतंर्गत 571, पशुसंवर्धन विभागांचे 27 दुधाळ जनावरे गट वाटप, नगरपरिषद 21, असे विविध योजनेतील 1271 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सदर शिबिरात 2 हजार चे वरमोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरित महसूल विभाग, नगरपालिका,वन विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, उमेद अश्या सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!