प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तर्फे देवळीत जागतिक अपंग दिन साजरा.
देवळी येथे ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, देवळी, जि. वर्धा तर्फे दिव्यांग असूनही विविध क्षेत्रात काम करून जीवन जगत असताना विविध अडचणीला सामोरे जाऊन आपापल्या जबाबदऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडणाऱ्या विविध दिव्यांग बंधावाच्या घरोघरी जाऊन त्यांचे व त्यांच्या जोडीदाराचे संघटनेतर्फे शाल, श्रीफळ,साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सामाजिक बांधिलकी जोपसणारे माजी नगराध्यक्ष जब्बार भाई तंवर, देवळी शहरातील व्यवसाईक शैलेश पाळेकर, पवन सुरकार , वैशाली झाडे, विष्णुजि फटिंग, त्याचप्रमाणे एकाच परिवारातील दोन्ही दिव्यांग असणारे पंकज गावंडे, नरेश वैद्य शासकीय नोकरीत असणारे पुरोषोत्तम पिसे, तसेच दिव्यांग असूनही सुतार काम करून संसाराचा गाडा खेचणारे सुभाष येवतकर या सर्वांचा व त्यांच्या जोडीदारचा शाल श्रीफळ तसेच यांच्या सौजन्याने साडी चोळी भेट देऊन सत्कार करून जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.यात प्रामुख्याने प्रहार दिव्यांग संघटना वर्धाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाडकर, जिल्हा संपर्क प्रमुख अमोद क्षीरसागर,उपाध्यक्ष शैलेश सहारे, उमेश खापरे, देवळी तालुका प्रमुख सचिन पोहाणे, सेलू तालुकाप्रमुख सुनील मिश्रा, ज्ञानेश्वर गिरसपुंजे तसेच प्रहारचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सागर झोरे साहसिक न्यूज-24 देवळी