प्रियकराने गळा दाबून केली प्रेयसीची हत्या

0

क्राईम प्रतिनिधी / नागपूर

नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून प्रियकराने आपल्याच प्रेयसीची ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हत्या केल्यानंतर सहा दिवस हा मृतदेह त्याच जागेवर पडून होता.फरजाना कुरेशी असं या मृत मुलीचं नाव असून तिचा मृतदेह पोलिसांनी नागपूरच्या इम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळ्यावरील निर्माणाधीन जागेवरुन ताब्यात घेतला आहे. तिचा बॉयफ्रेंड मुजाहीद अन्सारीला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत फरजाना कुरेशी आणि आरोपी मुजाहिद अन्सारी यांच्यात प्रेमसंबंध होते. ते दोघेही लग्न करणार होते. मात्र काही दिवसांआधी तरुणीचे लग्न दुसऱ्या मुलाशी पक्के झाले होते. त्यामुळे संतापलेल्या आरोपी मुजाहिद अन्सारीने तिला भेटण्यासाठी बोलवले होते. दोन डिसेंबर रोजी फरजाना कुरेशीला इम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळ्यावर आपलं संपवल्याची कबुली आरोपीने दिली आहे. फरजानाचा मृतदेह हा इम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळावरील निर्मणाधीन जागेत ८ डिसेंबर पर्यंत घटनेचा उलगडा होईपर्यंत तसाच पडून होता. त्यामुळे हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता.२ डिसेंबर रोजी बाहेर जाते म्हणून सांगून गेलेली फरजाना घरी परत न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी देखील मिसिंगची तक्रार दाखल करून तपासाला सुरुवात केली. मुलीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता तिचं आरोपी सोबत सातत्याने बोलणं झालं असल्याचे निष्पन्न झाले. फरजानाला शेवटच्या कॉल हा आरोपी मुजाहिद अन्सारीचा आला असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा आरोपीने फरजानाची हत्या केल्याची कबुली दिली.आरोपीने फरजानाची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर तो पोलिसांना इम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळावरील निर्मणाधीन जागेवर घेऊन गेला. ज्याठिकाणी फरजानाचा कुजलेला मृतदेह पडून होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!