प्रीतीश देशमुखचे होते विधानपरिषद लढण्याचे स्वप्न

0

प्रतिनिधी/ वर्धा:

आरोग्य विभागासह विविध परिक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात मुख्यसुत्रधार असलेला डॉ.प्रीतीश देशमुख याने वर्ध्यातही मोठी माया गोळा केल्याची चर्चा आता पुढे येऊ लागली आहे. इतकेच नव्हे तर तो नागपूऱ तसेच मुंबईतील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात वर्ध्यातील अनेक नेत्यांना दिसला असून विधानपरिषद लढविण्याचे त्याचे स्वप्न होते, अशी खमंग चर्चा वर्धा शहरात होऊ लागली आहे.डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख याचे स्नेहलनगर परिसरात मोठे आलिशान ‘राजवाडा’ नामक निवासस्थान आहे. त्याने घरासमोरील एका लेआऊटमध्ये तब्बल ८ हजार स्क्वेअरफूट जागा खरेदी केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडे माहिती विचारली असता अद्याप कुठलेही चौकशीचे आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी दिली आहे.

…………………..
आईचा बोलण्यास नकार…

स्नेहलनगर परिसरात असलेल्या डॉ.देशमुख याच्या निवासस्थानी त्याच्या आईची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्याच्या आईने बोलण्यास स्पष्ट नकार दिला. सुरक्षा रक्षकाने त्यांची प्रकृती ठिक नसल्याने त्या बोलू शकत नसल्याचे सांगितले.
……………..

दोन महिन्यांतून येत होता घरी
डॉ.प्रीतीश देशमुख हा दोन महिन्यातून वर्ध्यातील त्याच्या निवासस्थानी यायचा. आठ ते दहा दिवस राहून तो परत पुण्याला जायचा. अशी माहिती त्याच्या निवासस्थालगतच्या नागरिकांनी बोलताना दिली. मात्र, त्याने अल्पावधीतच ऐवढी माया कशी जमविली, याबाबत नागरिकही आर्श्चय व्यक्त करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!