मुक्ताईनगर येथील “खत्री गल्ली” सट्टा जुगार ची गल्लीला अभय का? नया “भिडू” नया राज ही गल्ली जिवनावश्यक मध्ये येते का? नागरिकांचा संतप्त सवाल

0

पंकज तायडे मुक्ताईनगर:

लॉकडाऊन असो की कडक निर्बंध अथवा जनता कर्फ्यु यात सर्व सहभागी होतात अपवाद खत्री गल्लीतील सट्टा व्यवसाय सुरूच असतो , एखाद दिवशी काही किरकोळ कारवाई झाल्यास मनाची समजूत म्हणून एखाद दिवस बंद ठेवला जातो परंतु लगेच नवा  भिडू नवा राज प्रमाने खात्री गल्ली चालू होतं आहे दिनांक 6 दिसेम्बर रोजी सुद्धा असाच प्रकार घडला आणि लगेच रात्री चालू झाला व्यवसाय जोरात असल्यामुळे   दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत असते. विशेष म्हणजे या भागात सट्टा लावणारे व घेणारे यापैकी कोणीही मास्क चा वापर करत नाही. मुख्य चौकात सहज कोणाचीही नजर पडेल अशा ठिकाणी येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे. . पोलिस कारवाई करतात परंतु ती थातूर माथूर असते .लागलीच त्या ठिकाणची  परिस्थिती जैसे थेच आहे. हि गल्ली जिवनावश्यक मध्ये येते का ? असा प्रश्न उपस्थित होत असुन नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येते  . सट्टाकिंग म्होरक्यालाच पोलीसांनी पकडले तर गल्ली खुली होईल.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासनाने आवाहन केलेला जनता कर्फ्यु असो की लॉकडाऊन किंवा नुकतेच विकेंड लॉकडाऊन  चे निर्बंध शहरातील सर्वच छोटे ,मोठे दुकानदार , व्यापारी तसेच नागरिक पूर्णतः आवाहनानुसार सहभागी होत असतात , परंतु याला अपवाद असतो प्रवर्तन चौकातील खत्री गल्ली येथील अतिक्रमण काढण्यात आले होते ते पुन्हा बसले यावेळेस बसलेच नाही तर पारंपरिक सट्याने कात टाकून येथे ऑनलाईन सट्टा देखील सुरू झालेला आहे.आणि हे सर्व भर प्रवर्तन चौकात सुरू आहे .पोलीस निरीक्षकांचे वाहन चौकात आले की , सर्वसामान्य लोकांना कायद्याचा बडगा दाखवला जातो मग याना का नाही यात काही साटेलोटे असा प्रकार आहे का असल्यास ही बाब गुलदस्त्यातच आहे असे नागरिक चर्चा करत आहे.

परंतु प्रवर्तन चौकातील सट्टा, ऑनलाईन सट्टा व चक्री चा खेळ या  अवैध धंद्यांच्या दुकानावर मात्र गर्दी असूनही तिला हटकले जात नाही की कुठली कारवाई होत नाही का ? तसे तर सदरील अवैध सट्टा चालक पोलीस गाडी चौकात आली की पोलिसांचा आदर म्हणून बजरंग टी सेंटर च्या मागील भागात ,डॉ सोनवणे च्या दवाखाना खालील तळमजला , अलंकार एम्पोरियम समोरील पत्री शेड  , भोई वाड्यातील रस्ता ,  गावंडे कॉम्प्लेस मधील जिना किंवा स्लॅब वर दबा धरून सट्टा घेण्याचे कार्य अविरत सुरू ठेवतात .

इतरांना  कायदा थोपवून अवैध धंदे चालकांना मुभा दिली जात असेल व तेथील गर्दीला आवर घालणे पोलिसांना जड जात असेल  तर आमच्या व्यवसायावरच निर्बंधाची कुऱ्हाड का ? असा सवाल उपस्थित इतर  व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे सर्वात आधी खत्री गल्लीतील अवैध धंदे बंद करावे.

पोलिस प्रशासन या अवैद्य व्यवसायावर कधी करणार कार्यवाही  ?

कारवाई होणार हे आधीच पोलीस प्रशासन सट्टा व  व्यवसायिक यांना सुचना करुन सांगतात अशी गोपनीय माहिती नेमकी कोण सांगत आहे नेमका तो हप्तेखोर पोलीस कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे थातुरमातुर कारवाई होते व शंभर दिडशे रुपयाचा मुद्देमाल मिळतो. किंग याला पकडले पाहिजे मुळावरच घाव का घालत नाही आहे पोलीस प्रशासन अशी जोरदार चर्चा नागरिक करत आहे

शाळकरी मुलाचे भविष्य धोक्यात बहुतांश मुलाचे भविष्य मटक्या च्या डोहाकडे ओढले जातं आहे पैसाच्या लालची मुळे होतोय हा प्रकार एक दिवसात 1 रु ला शंभर रुपये किंवा हजाररूपये मिळण्याच्या आमिषाने बळी पडून घरातच डाके टाकत आहे काही मुले त्यांचे आई वडील हात मजुरी करणारे पाई न पाई जमा करणारे असून त्यांना असा मोठा भुरदंड सोसावा लागता आहे आणि मुलाचे भविष्य बघणारे आईवडील  माझा मुलगा डॉकटर वकील अथवा इंजिनियर बनेल पण अश्या जोरदार सट्टा पत्ता गावात चालल्यामुळे ह्या मुलाचे भविष्य उध्वस्त होऊन त्या आई-वडिलांचा आशा ची निराशा होऊन म्हातारपणी आधार देणारा स्तंभ हिसकावून घेत आहे अशा अवैध सट्टा पत्ता धंदा करणारे याला नेमके जबाबदार कोण अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणारे की खेळणारे यावर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे

सट्टा चालू असलेल्या ची पावती बीट हवलदार करतात तरी काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!