हिंगणघाट : राष्ट्रवादी पक्षात राहुन अन्य पक्षाचे हितसंबंध जोपासणारी काही नेते मंडळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनिल राऊत व माझ्याकडून पक्षाची होत असलेली बांधणी थांबविण्यासाठी षड्यंत्र रचित आहे. काल एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 200 पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. राष्ट्रवादीचा आम्हीं घेतलेला पदाधिकारी मेळावा भव्य झाला. मागील डिसेंबर महिन्यात मी हिंगणघाट विधानसभा मतदार संघात काढलेल्या जनसंवाद यात्रेनंतर पक्षात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश होत आहे. या सर्व बाबींने विचलित झालेले आमच्या पक्ष्याचे काही नेते मंडळी चिडले असून, माझ्या व जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत साहेब यांच्या विरोधात षडयंत्र रचित हा नशेच्या आहारी गेलेल्या गांधी नावाचा कार्यकर्ताचा मोहरा म्हणून वापर करीत आहे. या गांधी नावाच्या कार्यकर्त्याने मला फोन करून नियुक्ती कशा केल्या असं विचारीत असभ्य अश्लील शब्दाच्या प्रयोग करीत शिवीगाळ करू लागला होता.समुद्रपूर येथे एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त गेलो असता हा गांधी नावाचा कार्यकर्ता मला भेटला यावेळी तो तुल्ल नशेत होता. व माझ्यासोबत हुज्जत घालत माझ्या कडे चालून आला. यावेळी मी त्याला बाजूला सारले असता तो नशेत असल्याने असंतुलित होत बाजूला पानठेल्याच्या लोखंडी अँगल ला धडकला यादरम्यान त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. त्याला दवाखान्यात जाण्याची सांगून आम्ही तिथून निघून गेलो मात्र यानंतर. काही नेत्यांनी आपल्या डॉक्टर पुत्राचा उपयोग करत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करून सावंगी येथे रेफर करून घेत आमच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही लोकांवर गुन्हा देखील नोंदवून घेतला मात्र यात जिल्हाध्यक्ष सुनील राऊत साहेब यांना देखील गोवण्यासाठी म्हणून काल पत्रकार परिषद घेत आपल्याच पक्षातील जिल्हाध्यक्षावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष सुनील राऊत हे आपल्या वर्धा येथील निवासस्थानी असताना देखील त्यांच्याविरुद्ध षडयंत्र करत गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारे हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून घेणारे आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या बचावासाठी आलो असे सांगत होते. मात्र याच मनीष गांधी नावाच्या व्यक्तीला आजपर्यंत अनेक लोकांनी त्याच्याकडून होत असलेल्या वागणुकी बाबत चोप देत मारहाण केली आहे. यादरम्यान एकही वेळा हे नेते आपल्या कार्यकर्त्याच्या बचावासाठी म्हणून पुढे आले नाहीत.या गांधी नावाच्या कार्यकर्त्याचा दारू पिऊन धिंगाणा घालीत लोकांकडून खंडणी मागण्याचा व्यवसाय आहे. मागे काही महिन्यांपूर्वी याच गांधी नावाच्या कार्यकर्त्याने खंडणी मागितल्याने एका युवकाने विष प्राशन करून स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता. या कार्यकर्ताकडून होत असलेल्या असल्या प्रयोगांना आम्ही घाबरणार नाही यामुळे मात्र पक्ष्याची प्रतिमा मलिन होत असल्याने अशा प्रकारच्या समाजविघातक वर्तनाला खतपाणी घालणाऱ्या नेतेमंडळीचा मी निषेध करतो व भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून भक्कम बांधणी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहु पक्षाची ताकद वाढवू यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे , वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,अशोक डगवार, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे,अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा सचिव गजानन शेंडे,जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, हिंगणघाट विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर,हिंगणघाट तालुका बूथ अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, समुद्रपूर बूथ तालुका अध्यक्ष गणेश वैरागडे, तालुका उपाध्यक्ष मंगेश गिरडे, आदिवासी जिल्हा उपाध्यक्ष संदीप उईके आदी पदाधिकारी उपस्थित होते.