भरउन्हात बोरखेडी शिवारात आग गोठ्या जळून खाक
गजेंद्र डोंगरे / मदनी आमगाव:
नजीकच्या बोरखेडी येथील शेत शिवारात भर उन्हात अचानक लागलेल्या आगीत शेतात असलेला गोठा जळून खाक झाला असल्याची घटना परिसरात घडली असून गोठया वरून विद्युत तारे असून तारेच्या घर्षणामुळे आग लागल्याची माहिती स्थानिक लोकांकडून सांगितल्या जाते .मात्र,गोठ्यात गाई बांधून नसल्या मुळे मोठी हानी टळली.
गोठ्यात बांधून असलेली दोन वासरे मात्र आगीत जखमी झाले.
परिसरातील बोरखेडी येतिल शेतकरी सतिश जमाने यांचे गावाला लागुन दोन येकर शेत आहे.शेतात गाईचा गोठा बांधला होता. त्यांच्या शेतातून महावितरणची वीद्यूत लाईन गेली आहे. दुपारी 04 वाजता च्या सुमारास विद्युत लाईनच्या तारामधे घर्शन झाल्या मुळे तपत्या उनात आगीचा लोंढा गोठ्या वर पडला असुन गोठ्याला आग लागुन गोठा जळुन खाक झाला.व गोठ्यात बांधून असलेली दोन वासरे गोठ्याला लागलेल्या आगीमधे जखमी झाले.तसेच शेतकर्यानी जमा केलेले खरगुत चारा,वैरन,कूटार,दावे दोर्खंड ,४ पाईप ,२ डवरे,१वखार, ६टिना , १जुजाड,२ ताडपत्री ,तसेच इमाला जळुन खाक झाले असून विद्युत महामंडळ यांनी हात वर करीत असल्याचे सतीश जमणे यांनी सांगितले.मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मोबदला मिळावा असे शेतकऱ्यांचे मत आहे. गावकर्याच्या मदतीने गोठ्याला लागलेली आग वीजवन्यात आली मात्र त्यात गरिब शेतकरी सतिश मधुकर जमाने यांचे मोठे नुकसान झाले.
सतिश जमाने यांच्या कडे दोन एकर शेती आहे शेतीत नापिकी झाल्या मुळे शेतकरी जमाने यानीशेतीच्या पिकिवर कुटुंबाचा उदर निर्वाह होत नसल्या मुळे शेतीला जोड व्यवसाय मनून दूधाचा व्यवसाय सुरु केला व दुध विकुन कुटुंबाच्या गरजा पुर्ण करत असे मात्र आता गाईच गोठा जळुन खाक झाल्या मुळे गाई बांधायच्या तरी कुठे हा मोठा प्रश्ण त्यांच्या समोर ठाकला आहेत तर शाषनाने पंचनामा करुन मदत करावी असे शेतकरी जमाने यांच्या कडून बोलले जात आहे.