भरपावसात धडकला सिंदीच्या पालिकेवर मोर्चा
Sahasik news 24
@pramodpanbude Wardha :
सिंदी रेल्वे शहरातील सर्व नागरिकांना जाचक ठरणारा घर टैक्सच्या विरोधात आज शुक्रवारी भर पावसात सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला होता.भरपावसात निघालेल्या या मोर्चाची दखल घेत मुख्याधिकारी विजय आश्रमात यांनी समस्त नागरिकांकडील कर एक महिन्यात कमी करुन देण्यात येईल ,असे मान्य केल्याचे पत्रपरिषदेत आयोजक अतुल वांदिले यांनी सांगितले.
आज दुपारी गांधी चौकातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले.त्यांच्यासोबत इतरही पक्षांचे स्थानिक पुढारी सहभागी झाले होते.पालिका कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.तेथे जबरदस्त नारेबाजी करून संतप्त जनतेने परिसर दणाणून सोडला.मुख्याधिकारी यांनी मोजक्याच लोकांना पाचारण करण्याची विनंती केली.त्यानुसार माजी नगराध्यक्ष ब.रा.हिंगणेकर,सुधाकर खेडकर, गंगाधर कलोडे, ओमप्रकाश राठी,अशोकबाबू कलोडे व वांदिले तसेच नायब तहसीलदार ठाकरे यांनी सधन चर्चा करुन जिल्हाधिकारी कर्डिलेशी संपर्क साधला.जिल्हाधिकारी यांनी जनाक्रोश बघता एक आठवड्यात कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याचे मान्य केले.तसेच अवाजवी घरटैक्स कमीतकमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,असे आश्वासन दिले.
भरपावसात पालिकेपुढे हजर नागरिकांना झालेल्या चर्चेची माहिती मुख्याधिकारी आश्रमा यांनी दिली.एक महिन्यात घर टैक्सच्या आकारणीचा घट झाली नाही,तर १७ आगस्टपासून उग्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल.त्यानंतर होणारा परिणामास जनता जबाबदार राहणार नाही,असे श्री.वांदिले यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे नागरिक,पोलिस प्रशासन, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पत्रकार यांचे आभार गंगाधर कलोडे यांनी मानले.