🔥हाच तो भ्रष्टाचारी पोलीस शिपाई विकास देवतळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात🔥भ्रष्टाचारी विकास एसीबीच्या जाळ्यात,एसीबीच्या कारवाईने देवळी पोलिसात दहशत.
देवळी -/पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुरवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान देवळीतील २९ वर्षीय पुरुष यांच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा यांनी लाचेची मागणी करणाऱ्या देवळी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई विकास अजबराव देवतळे वय ३४ वर्ष बक्कल नं ७४२ व त्यांचा खाजगी सहकारी दलाल आशिष नारायणराव पाटणकर वय ३० वर्ष रां. मनोहर मंदिर जवळ वार्ड क्रमांक १० देवळी यांना पाच हजाराची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती वर्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
प्राप्त माहितीनुसार देवळीतील २९ वर्षीय मूळ तक्रारदार यांने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की ९ ऑगस्ट रोजी तक्रारदारास पोलीस स्टेशनला बोलवून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदार यांना पंचवीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली तेव्हा तडजोडी अंति २३ हजार रुपये देण्याचे ठरले परंतु तक्रारदार हा रोज मजूर गरीब असल्यामुळे २३ हजार रुपये कुठून देणार तेव्हा त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा यांच्याकडे रीतसर तक्रार १२ ऑगस्ट रोजी दिली तेव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पाच हजार रुपयाची लाच पोलीस शिपायाला तक्रारदाराने २० ऑगस्ट रोजी दिली परंतु त्याचा सोबत असलेला खाजगी दलाल आशिष नारायण पाटणकर यांच्याकडे दिली परंतु त्या लाचखोर पोलीस शिपायाला संशय आल्याने त्यांनी ती रक्कम खाजगी दलालाकडून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु एसीबीने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आणि आरोपी क्रमांक दोन त्याचा खाजगी साथीदार याला सुद्धा काही वेळानंतर अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांना देवळी पोलीस स्टेशन जिल्हा वर्धा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२-सहकलम २३८(BNS) अन्वे गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक कान्होपात्रा बन्सा,पोलीस निरीक्षक संदीप मूपडे, पोलीस उपअधीक्षक राकेश साखरकर,यांच्या नेतृत्वात व पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आव्हान करण्यात आले की भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकांनी लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार करून भ्रष्टाचारास आळा घालण्यास मदत करावी असे आव्हान करण्यात आली आहे.
देवळी शहरांमध्ये खुलेआम गांजा,ड्रग्स,दारू, एम डी, पोलिसांच्या आशीर्वादाने हप्ते खोरी करून चालविण्यात येत आहे देवळी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोपावलेला आहे पोलिसांविरोधात कुणीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यास त्याच्या मनात भीती असते परंतु शेवटी एका गरीब मजुरा जवळ पैसे नसतानाही जबराईने लाच मागण्यात आली शेवटी “मरता क्या न करता” अखेर तक्रार देऊन भ्रष्टाचारी मस्तावलेल्या पोलीस शिपायाला व त्याच्या खाजगी सहकारी दलाला त्याची जागा दाखवण्यात आली देवळी पोलीस स्टेशनमध्ये ऑन ड्युटी कार्यरत असलेला पोलीस शिपाई जर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीत रंगेहात सापडला असेल तर त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे अन्यथा देवळीकर जनता अश्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे.