मदनी आमगाव भागात दमदार पावसाची हजेरी..

0

By साहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे/ मदनी (आमगाव):
परिसरात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकरी खरीपाच्या पेरणी साठी पेरणीपूर्व मशागती सुरु करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
मागील १५ दिवसा अगोदर काही भागात पाऊस पडला होता मात्र,आज दुपारी ४ वाजता पासून जोरदार पाऊस पडला असून जोरदार पाऊसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.मात्र, यात कोणाचेही फारसे नुकसान झाले नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांची काढणी करून शेतीची नांगरणी केलेली असल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितल्या जात आहे.
पावसामुळे काही ठिकाणी पाणी वाहू लागले होते तर बऱ्याच ठिकाणी साचले होते. मात्र कडक उन्हाळा व बिगरमोसमी पावसाची पहिलीच जोरदार हजेरी असल्यामुळे दोन तीन तासात पाणी जिरले. त्यामुळे पावसामुळे जन जीवनावर काहीही परिणाम झाला नाही. शेतकरी वर्गाकडून मात्र खरीप पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक साधन सामुग्री गोळा करण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!