मध्यम उद्योजक व व्यावसायिक लोकांची पिळवणूक होणार हे स्पष्ट आहे- अविनाश काकडे, सेवाग्राम, वर्धा (महाराष्ट्र)
प्रतिक्रिया –
बजट 2022-23 भारत सरकार
मध्यम उद्योजक व व्यावसायिक लोकांची पिळवणूक होणार हे स्पष्ट आहे- अविनाश काकडे,सेवाग्राम, वर्धा (महाराष्ट्र)
प्रतिनिधी / वर्धा :
वर्ष 22-23 चे वार्षिक बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारामण यांनी देशासमोर मांडले.
एकुण 39.45 लाख करोड रुपयाचे बजेट मध्ये 15.06 लाख करोड रूपए वित्तीय घाटा असण्याची शक्यता आहे.
या बजेट मध्ये अति श्रीमंत कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला. कार्पोरेट टैक्स 18 वरून 15 टक्के आणि सरचार्ज 12 वरून 7 टक्के करण्याने देशातील पाच पन्नास कार्पोरेट उद्योग व व्यक्तिंना लाखो करोड रुपयांचा फायदा यातून होणार. मध्यमवर्गीय लोकांचे टैक्स स्लैब जसेच्या तसेच ठेवून त्यांच्या कडून व मध्यम उद्योजक व व्यावसायिक लोकांची पिळवणूक होणार हे स्पष्ट आहे. कच्च्या तेलावर चार्ज वाढवण्याचे संकेत म्हणजे घरगुती गैस , पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढणार हे स्पष्ट दिसत आहे. त्या अनुशंगाने महागाईवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही.
शेतीच्या संबंधात काल्पनीक आदर्शवाद दाखवण्याच्या नादात मुलभुत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यांत आले आहे. सेंद्रीय शेतीचा अनावश्यक ढोल पिटून खते निविष्ठांच्या बाबतीत कुठलीही घोषणा आज झाली नाही. सरकार ने शेती प्रश्नातून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पादन वाढवण्याकरता आवश्यक कोणतीही महत्वाकांक्षी घोषणा आज झाली नाही. ओलिताखाली शेती वाढीस 44 हजार करोड रूपयांची घोषणा म्हणजे उंटाच्या तोंडात जीर्याचे दाणे असेच आहे. देशात एकुण 2 हजार लाख हेक्टेयर शेती खालील जमीनीत सरकारचे 9 लाख हेक्टेयर जमीन ओलिताखाली आणण्याचे वार्षिक उद्दीष्ट असेल तर पुढील दोनशेहून जास्त वर्षाचा काळ लागेल संपुर्ण शेती ओलिताखाली आणण्यासाठी. एकुणच आजचा बजेट म्हणजे नेहमीप्रमाणे वाचाळविरांचे भावनिक वातावरण निर्मिती चे प्रयत्न होते, त्यातून सामान्य आणी कमजोर भारतीयाला काहीही हाती लागणार नाही हे पक्के आहे.