महानिर्मिती व्यवस्थापकाचे दुर्लक्ष उपोषणकर्ते वाऱ्यावर….

0

बाळापूर -/ महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्रभर सातही पावर स्टेशन मध्ये आमरण उपोषण आंदोलन चालू आहे तसेच महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव माननीय सतीश तायडे हे पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आमरण उपोषणामध्ये बसलेले आहेत तरी त्यांच्या उपोषणाला आज रोजी आठ दिवस पूर्ण होत आहेत तरीही प्रशासन यांनी कुठलीच प्रकारची दखल घेतलेली नाही यांच्या जे मागण्या आहेत एकदम रास्त मागणी आहेत तरीही सरकार प्रशासन दुर्लक्ष करत आहेत काही पॉवर स्टेशनमध्ये संच बंद पडलेले आहेत काहींना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहेत ठीक ठिकाणाहून वेगवेगळ्या संघटना सर्व पक्षाचे पदाधिकारी हे आमरण उपोषणाला भेट देऊन निर्देशन देत आहेत लवकरात लवकर या कंत्राटी कामगाराच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सर्व कंत्राटी कामगार यांच्या परिवार घेऊन मोठे आक्रोश मोर्चा काढतील व त्यांच्या मागण्या लवकरच सरकारने पूर्ण कराव्यात अन्यथा मोठे आंदोलने आणि निदर्शने मोर्चे काढण्यात येतील सतीश तायडे हे मरणाच्या दारात उभे आहेत आठ दिवस म्हटले तर खूप झाले मेल्यानंतर प्रशासन जागी होईल का?असा सवाल संघटनेचे उपाध्यक्ष नितेश तायडे यांनी केला आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही सतीश तायडे हे गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषणा बसले आहेत सर्वात महत्त्वाची मागणी आहे त्यांची मेडिक्लेम लागू झालीच पाहिजे दुसरी आहे तीस टक्के पगारांमध्ये पूरक भत्ता वाढ झाली पाहिजे आणि विविध पाच मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्येने कामगार उपस्थित होते जर मागणी पूर्ण झाल्या नाहीत तर महाराष्ट्राला मोठा फटका बसू शकतो विजेचा आणि यानंतर सरकारने लक्ष द्यावे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे ठामपणे सतीश तायडे यांनी सांगितले.

रणजित तायडे साहसिक news-24 बाळापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!