सेलू / तालुक्यातील महाबळा येथे मातृदिन साजरा करण्यात आला मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो तसेच हा कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या आईचा तसेच मातृत्व मातृत्व बंद आणि समाजातील मातांचा प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव आहे.हा जगातील बराच भागामध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो. दुर्गामाता भजन मंडळांनी सावित्रीबाई यांचे समाजापुढे महिलांच्या जीवनामध्ये खूप मोठे योगदान आहे हे त्यांच्या भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करून त्यांनी समाजापुढे मांडले आहे सावित्रीबाई सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखला जातात जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले आज त्यांच्या या विचारांनी भजन मंडळांनी त्यांच्या फोटोचे पूजन करून समाजामध्ये महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचे धाडस आज त्यांच्यामुळे महिलांना मिळाले आहे ही प्रेरणा देऊन कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाला सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा संस्थेच्या अध्यक्ष दिपमाला मालेकर सल्लागार पंकज येसनकर यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करून दुर्गा माता भजन मंडळ महाकाळ येथील सर्व सभासद शशिकला फंड जिजाबाई पोहाणे,सुनंदा तेलरांधे,लता बोरकर, सुमित्रा वाघाडे,लता इरपाते,सुशीला पोहाणे,मंगला तडस,मंदा भुते,सुंदरबाई उईके,वर्षा तिजारे,प्रतीक्षा तेलरांधे, शरद तळवेकर,आदींच्या उपस्थितीत मातृदिन साजरा करण्यात आला.