महामार्ग प्राधिकरणाच्या उडान पुलाला भ्रष्टाचाराचे भगदाड….

0

🔥हिंगणघाट येथे राष्ट्रीय महामार्गावरील उडान पुलावर चक्क जीवघेना भगदाड….

🔥राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील उडान पूल बनतोय धोकादायक…

🔥उडान पुलाखालून पुलावरील भगदाडातून दिसते खुले आभार…

🔥दोषींवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी…

हिंगणघाट-/ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर मोठा खड्डा पडलेला आहे.रसत्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे.या रस्ता बांधनाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर तातडीने कारवाई करण्यात यावी व पडलेल्या खड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा ईशारा…
शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील नांदगाव चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचे बांधकामाला दोन वर्षे झाले असून पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून कश्मीर ते कन्याकुमारी ला जाणार हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावरील पुलावर भला मोठा खड्डा पडलेला आहे.या महामार्गावरून प्रवास करताना वाहतुकीस हा खड्डा अडथळा बनत आहे.या महामार्गाने येता व जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकींचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेंट जॉन कॉन्व्हेंट पर्यंत उडानपुल मागील तीन वर्षांपूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता… वाहतुकीसाठी सुरू झालेला हा उड्डाणपूल सुरू होताच अनेकदा बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली होती.यादरम्यान अनेकदा या उडानपुलाची डाग डुजी करण्यात आली.मात्र आता तर या उडान पुलाच्या मधोमध आर पार दिसणारा मोठा भगदाड पडला आहे.राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत असतात.यासोबतच महामार्गाने असंख्य जड वाहने क्षणाक्षणाला धावत असतात.सध्या परिस्थितीत झालेल्या या भगदाडावर ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी व व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा ईशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा,अमोल बोरकर, किशोर चांभारे, जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत, सुनील भुते,वाहतूक सेल उपाध्यक्ष हेमंत घोडे, किशोर चांभारे,जिल्हा सचिव अनिल लांबट, संजय गांभुले,बच्चू कलोडे,गजानन महाकाळकर,समीर शेख, सुशील घोडे,पंकज भट्ट, नितेश नवरखेडे,अमोल भिषेकर, आकाश हुरले, सुखदेव चाफले, अक्षय तोडासे,रोहित हजारे, खुशाल वैद्य, हर्षल चटप आदी उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!