महारोगी सेवा समितीची तोतया अध्यक्ष विभा गुप्ता हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळासह अन्य संघटनेची मागणी

0

विषेश प्रतिनिधी / वर्धा :

महारोगी सेवा समितीची तोतया अध्यक्ष विभा गुप्ता व गाजियाबाद (उत्तरप्रदेश) येथून आयात करुन आणलेला सचिव ओमप्रकाश द्विवेदी विरोधात महारोगी सेवा समितीच्या शेड्यूल-१ वर कुठेच नाव नसताना मागील १५ वर्षापासून भोपुंजी बनून महारोगी सेवा समितीची संपत्ती विकून स्वत:चे पोट भरणार्‍या विभा गुप्ता यांनी कोणताही अधिकार नसताना महारोगी सेवा समितीची सेलडोह येथील मौजा सोमलगड शिवारातील जमिनीतील मुरुम विकून स्वत:च पैसे खर्च केले आहे. महारोगी सेवा समिती च्या शेड्यूल-१ वर सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये विभा गुप्ता, ओमप्रकाश द्विवेदी या भामट्याचे नाव नसताना केंद्रातील काही सचिव यांचा वापर करुन पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्यावर दबाव आणुन विभा गुप्ता जबरीने महारोगी सेवा समिती मध्ये कार्य करीत आहे. कृष्ठरोगी बांधवांची सेवा न करता त्यांचा जिव घेण्याचा प्रकार विभा गुप्ता करीत आहे. मागील महिन्यात ४ कृष्ठरोगी मृत्यू पावले आहे. वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचा उद्देश सत्य आणि अहिंसेवर आधारित समाज स्थापन करणे हा आहे. ज्यात मानवीय आणि लोकशाही मुल्यांची प्रेरणा अग्रस्थानी आहे. जे शोषण, दडपशाही, अनैतिकता आणि अन्यायापासून मुक्तता आणि ज्यात मानवी व्यक्तीमत्वाच्या सर्वांगीण विकासाकरीता पुरेशी संधी आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांनी काही मुल्ये आणि दुही ठेवून सर्वांच्या कल्याणाकरीता सर्वोदयाची पायाभरणी केली आहे. आपण सर्व त्याचे मजबुत आधारस्तंभ आहोत. वरील उद्देशाची पुर्तता करण्याकरीता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांचे मुल्य समाजात रुजविण्याकरीता वर्धा जिल्ह्यात अनेक महात्मा गांधी यांच्या विचारावर कार्य करणार्‍या संस्था सुरु झाल्यात. यात महारोगी सेवा समिती दत्तपूर ही पण संस्था होती. परंतू संस्थेकडे असलेली मालमत्ता पाहून अनेक लोकांची वक्रदृष्टी पडली आणि स्वत:ला स्वयंघोषित अध्यक्ष जाहीर केले. महारोगी सेवा समिती दत्तपूर या संस्थेच्या स्वयंघोषित अध्यक्षांवर काही दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. परंतू अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अनेक वर्षापासून भ्रष्टाचार याच स्वयंघोषित अध्यक्षांच्या कार्यकाळात झाला आहे.
याची चौकशी करावी व सोबतच मागील २ महिन्यात महारोगी सेवा समिती ची तोतया अध्यक्ष विभा गुप्ता यांनी महारोगी सेवा समितीच्या मालकीचे ट्रॅक्टर, दालमिल, १६ लॅपटॉप चोरुन नेले आहे. याबाबतही सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा या तोतया अध्यक्ष विभा गुप्ता वर गुन्हा नोंद करावा व अटक करावी, अशी मागणी वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ चे अध्यक्ष मोहन खैरकार, आचार्यकुल या संस्थेचे राष्ट्रीय संयुक्त मंत्री  कैलास रावत, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र एन. कोटंबकार,समाज सेवक विल्सन मोखाडे यांनी केली आहे. तोतया अध्यक्ष विभा गुप्ता व सचिव ओमप्रकाश द्विवेदी यांच्यावर कारवाई केली नाही, तर ५ डिसेंबर २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा गांधी व विनोबा समर्थक यांनी दिला आहे.
(क्रमश:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!