मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गुटखा विक्रीला येतेय गती

0

 

मुक्ताईनगर / पंकज तायडे

मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे दररोज लाखो रुपयांचा गुटखा मुक्ताईनगर तालुक्यात येत असून हा गुटखा नेमका येतो तरी कुठून ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. राज्यामध्ये गुटखा बंदी असताना सुद्धा गुटखा नेमका बनतो तरी कुठं ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . शहरातील परिवर्तन चौका लगतच असलेल्या छोट्या मोठ्या टपऱ्या अथवा काही मोठ्या दुकानांमध्ये गुटका हा सर्रासपणे किरकोळ अथवा होलसेल भावात विकला जात आहे. यासंदर्भात वृत्तपत्रांतून वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. तरीसुद्धा अद्याप  एकही कारवाई मुक्ताईनगर तालुक्यात झालेली नाही. यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याला खाजगी महसूल मिळतो का ? किंवा प्रशासनाला महसूल मिळतो का? मग राज्यात गुटखा या गोष्टीला बंदी का घातलेली आहे. हे बंदी का फक्त कागदोपत्री आहे का असाही प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. परिवर्तन चौकात प्रशासनातील अधिकारीवर्ग बऱ्याच वेळा ये-जा करत असतात दोन पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी उभेच असतात त्यांना या बाबतीत माहिती का नसावी ही माहिती असून सुद्धा कानाडोळा केला जात आहे नेमके कानाडोळा करण्याचे कारण काय यात काही आर्थिक व्यवहार ची देवाण-घेवाण तर नाही ना अशी चर्चा नागरिक करत आहे
याकडे मात्र तरुण पिढी  जास्त आकर्षित होत असते यामुळे लहान मुले गुटख्याच्या आहारी जाऊन त्यांना व्यसन लागत आहे व त्यातून मोठं मोठी आजार होताना दिसून येत आहे कॅन्सर सारखी आजार देखील उद्भवत आहे त्यामध्ये कुठले केमिकल वापरले जाते की नागरिकांना तो गुटका सेवन करावाच लागतो असं काय असते नेमके त्या गुटख्यामध्ये  राज्यामध्ये गुटखा बंदी असूनही स्थानिक ठिकाणी का गुटका विक्री सुरू आहे. वृत्तपत्रांमध्ये वारंवार प्रसारित होऊन देखील प्रशासन कुठल्याच प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही असेही चित्र स्पष्ट दिसत आहे प्रशासन दखल घेणार की नाही ? असाही सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत
मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काही किराणा दुकान फक्त नामधारी  किराणा दुकान म्हणून दिसतात परंतु त्यामध्ये गुटखा होलसेल विकण्याची देवान घेवान जास्त प्रमाणात होत आहे याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे
तहसील कार्यालयात असणाऱ्या काही ठिकाणी विमल गुटखाच्या पुड्या सुद्धा आढळून येत आहे  कर्मचारी अथवा त्यासोबत नागरिकही मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करीत असल्याचे यावरून दिसून येते.
परिवर्तन चौका तच प्रशासनातील अधिकारीवर्ग बऱ्याच वेळा ये-जा करत असतात दोन पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी उभेच असतात त्यांना या बाबतीत माहिती का नसावी ही माहिती असून सुद्धा कानाडोळा केला जात आहे नेमके कानाडोळा करण्याचे कारण काय यात काही आर्थिक व्यवहार ची देवाण-घेवाण तर नाही ना अशी चर्चा नागरिक करत आहे
राज्यात गुटखा बंदी आहे परंतु जवळच असलेल्या मध्य प्रदेशातून येणाऱ्या गाड्या पोलीस प्रशासनातर्फे काटेकोरपणे चेक पोस्ट वरती चेक केल्या जातात परंतु विमल गुटखा ची गाडी कशी सुटते असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे नेमके पूर्णाड फाट्याकडे असलेले बीट हवलदार करतात तरी काय त्यांना अशा विमल गुटखा यांच्या गाड्यांची माहिती नाही का असल्यास तेच तर या विमल गुटखा यांच्या गाड्या पास करत नाही ना सोडत नाही ना अशी चर्चा नागरिक व्यक्त करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!