मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात कामगारांना न्याय मिळाला,अशोक शिंदे..

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शिवसेनेने आयोजित कार्यक्रमात १२०४ किचन सेट चे वाटप,तर २०० नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ.

वर्धा / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात गवंडी कामगारांना योजनांचा लाभ मिळाला ते मेहनती मुख्यमंत्री असून ते दिवस रात्र जनतेच्या कामात व्यस्त असतात असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तसेच जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे यांनी केले ते राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने दि.९ फेब्रुवारी रोजी नोंदणीकृत कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटत तसेच सरकारी किचन सेट पेटीचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते तसेच जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे होते तर प्रमुख अतिथी आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाप्रमुख राजेश सराफ व गणेश इखार, गवंडी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत रामटेके,महिला आघाडी जिल्हा संघटिका वंदना भुते, सामाजिक कार्यकर्ते विजय ताजने, युवासेना जिल्हाप्रमुख निखिल सातपुते, उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, तालुका प्रमुख राहुल चहांदे, युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख कल्याणी भोंगाडे, वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक इनामदार यांची उपस्थिती होती. यावेळेस आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मार्गदर्शक करतांना सांगितले कि, मागील १० वर्षापासून कामगारांसाठी असलेल्या योजनाचा लाभ प्रत्येक कामगारा पर्यंत पोहचवण्याचा संकल्प सरकारचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी मान्यवरांचे हस्ते कामगारांना किचन सेट पेटीचे वाटप करण्यात आले. प्रसंगी १२०४ कामगारांनी किचन सेट पेटीचा लाभ घेतला तर २०० रुग्णांनी आरोग्य तपासणी करून औषधोपचार करून घेतला.
कार्यक्रमाचे संचालक व आभार प्रदर्शन दिलीप भुजाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गजानन ठमके यांची वैद्यकीय चमू व कर्मचारी तसेच मंगेश भोंगाडे,कल्याणी भोंगाडे,
विजय ताजने, राहुल चहांदे, निखिल सातपुते, नितीन देशमुख, योगेश मुंजेवार,गोलू भोंग,चेतन ठाकरे, गजानन तडस, मनोज खेडकर,शशिकला क्षीरसागर, बबलू मात्रे, कृषाली चौधरी, सोनू कुव्वर, किरण खऊट,ममता सिंग, शरला माहुरे यांनी परिश्रम घेतले.

 सहासिक न्युज/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!