मेव्हण्याच्या मदतीने बहिणीने केला भावाचा खून

0

 

क्राईम प्रतिनिधी / भंडारा:

दगडाने ठेचून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कान्द्री जवळील पांजरा शिवारात घडली. घटनास्थळी आंधळगाव पोलीस पोहचवून घटनेचा पंचनामा करीत तपासाचे चक्र झपाट्याने वाढविले. अवघ्या चार तासातच मृतक रोशन रामू खोडके (वय 28) वर्षे राहणार कांद्री याच्या मारेकऱ्याला त्यात त्याची सख्खी मोठी बहीण लहान मव्हने व त्याच्या मित्राला आंधळगाव पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मोठी बहीण मनीषा चुधरे व लहान मेव्हणे हीतेंद्र रतिराम देशमुख (वय 29 वर्षे) व प्रेम उमा चरण सूर्यवंशी (वय 22) वर्षे यांच्या समावेश आहे.
मृतक रोशन रामू खोडके याचे आई-वडील लहानपणीच मरण पावल्याने मोठी बहिण मनीषा ईश्वर चुधरेकडे कांद्री यांच्याकडे राहत होता. रोशन बहिणीकडे मोठा होऊन मोलमजुरीच्या कामाला जात असे. रोशन ला दारूचा नाद लागल्याने रोशन नेहमी बहिण मनीषा व भाची यांना दारू पिऊन नेहमी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत असे.
त्यामुळे बहिण मनीषा पती ईश्वर नेहमी संतापलेले असत. राग अनावर झाल्याने रोशनची मोठ्या बहीनीने आपल्या जांब येतील लहान मेव्हणे हीतेंद्र देशमुख यांना रोशन नेहमी देत असलेल्या त्रास संबंधी सांगितले. यातच मोठी बहीण मनीषा व मेव्हणे हितेंद्र रतिराम देशमुख व प्रेम उमा चरण सूर्यवंशी यांनी रोशन खोडके याला कांद्री येथुन दारू प्यायला दिली.
मोटर सायकलने पांजरा गावातील शेत शिवारात नेऊन त्याचा गळा दाबला व त्यानंतर त्याच्या डोक्यावर पाठीमागे दगडाने मारून ठार केले. मात्र हे सर्व आरोपी अवघ्या चार तासात जेरबंद करण्यात आले असून तीनही आरोपी यांना आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!