🔥राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांचे कार्य कौतुकास्पद – ऍड रोहिणी खडसे महिला प्रदेशाध्यक्षा.
🔥राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. रोहिणी खडसे यांची उपस्थिती.
सिंदी (रेल्वे) / येथे साई स्पोर्टिंग क्लब सिंदी (रेल्वे) व प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या संयोजकांने आयोजित राज्यस्तरीय पुरुष व महिला कब्बडी स्पर्धेचे आयोजन शहरातील न्यु. नेहरू विद्यालयाचे पटांगणावर आयोजित करण्यात आले होते. या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ऍड.रोहिणी खडसे यांनी उपस्थित राहत आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
सिंदी रेल्वे या शहरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या गेली आहे शांत नियोजित पद्धतीने राज्यस्तरीय स्पर्धा अतुलभाऊ यांनी आयोजित केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना नक्कीच एक वेगळ व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अतुलभाऊ यांनी केला आहे. आणि आजच्या मोबाईलच्या काळामध्ये आपण खेळापासून दूर चाललो आहेत आपण खेळायला विसरलो आणि आयुष्याच्या खेळ खेळत बसलोय ही अवस्था आपल्या प्रत्येकाची झाली आहे. खेळाकडे दुर्लक्ष झाल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे आज या राज्यस्तरीय खेळामध्ये महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे.याचे मला आनंद होतोय खेळाडूंना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक अतुलभाऊ व साई क्रिडा मंडळाचे मनापासून अभिनंदन करते असे मनोगत महिला प्रदेशाध्यक्ष ऍड रोहिणी खडसे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत,तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, पूर्व विदर्भ अध्यक्षा डॉ. सुरेखाताई देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई देशमुख, अकोला जिल्हाध्यक्षा सुषमाताई कावरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, महिला शहराध्यक्ष मृणाल रिठे, सुचिता सातपुते, दिपाली रंगारी, सुजाता जांभुलकर, जिल्हा सहसचिव गजानन शेंडे, अमोल बोरकर, गणेश वैरागडे, तुषार हिंगणेकर, संजय लोणकर, सुनील भुते, राजू मेसेकर, परम बावणे, अनिल लांबट, संदीप निंबाळकर, नितीन भुते, जगदीश बोरकर, तुषार थुटे, गणपत ढगे, उमेश नेवारे, हेमंत घोडे, नदीम भाई, राहुल जाधव, राजू मुडे, रोहित बक्षी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.