मोदी सरकारचे ८ वर्ष म्हणजे देशाला लाभलेली एक अभूतपूर्व अशी भेट – खा. रामदास तडस

0

By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/वर्धा:
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या यशस्वी कार्यपद्धतीमुळे वर्षाच्या कार्यकाळात भारताने नय्या युगाकडे वाटचाल केली आहे. जगभर वेगळी छवी निर्माण करण्यात यश मिळाले. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या आधारे मोदी सरकारची मागील आठ वर्षातील वाटचाल राहिली आहे. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय गोरखा अंत्योदयची कल्पना मोदी सरकारने ख-या अर्थाने राबवली आहे. प्रत्यक्षात आणली आहे. समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण म्हणजे अंत्योदय आपल्या सर्व कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात की नाही. याची खबरदारी मोदी सरकारने घेतली. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने लक्ष ठेवून होते. त्यामुळेच देशातील सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मोदी सरकारने १०० टक्के गरजू लोकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सोडला होता. तो शंभर टक्के पूर्ण झाला आहे. मोदी सरकारच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू गरीब कल्याण हाच आहे. गोरगरिब, सामान्यांचे जीवनमान उंचावणारे त्यांना प्रवाहात आणणारे कल्याणकारी निर्णय देणारी आहे. प्रतप्रधानांच्या यशस्वी नेतृत्वाखाली देशाची ओळख सुरक्षित भारत, प्रतिष्ठित भारत, आत्मनिर्भर भारत म्हणून विकसित होत आहे. मोदी सरकारची जन धन योजना, उज्ज्वला योजना, स्टार्टअप, जल जीवन मिशन, पीएम आवास योजना, सौभाग्य योजना, गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आयुष्मान भारत योजना, स्वच्छ भारत मिशन, मुद्रा योजना, एक देश एक रेशनकार्ड, अटल भूजल योजना बीमा योजना आणि इतर अनेक लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीबांच्या कल्याणासाठी सतत काम करत आहे. निर्वासितांना राम मंदीराकरिता स्वतंत्र ट्रस्ट निर्मीती, राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा, भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व कायदा कलम ३७० रद, तिहेरी तलाक, नागरिकत्व कायदा, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट स्ट्राइक अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन देशाला नवी दिशा देण्याचे कार्य केलेले आहे. गेल्या ८ वर्षात आपला प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी फार मोठे योगदान लाभले आहे. अयोध्दा येथील राममंदीर, काशी विश्वनाथ, विविध तीर्थक्षेत्र, पवित्र स्थळ आणि इतर पर्यटन स्थळांचा विकास करून नरेंद्र मोदीनी आपल्या संस्कृतीला नवा श्वास दिला आहे.
दोन वर्षांच्या कोरोना आपत्तीने देशच नाही तर संपूर्ण जग ठप्प झाले होते. यावेळी देशातील एकाही गरीब माणसावर उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. याची काळजी मोदी सरकारने घेतली. देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला रेशनमधून दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले. पंतप्रधान गरीब कल्यान योजना ही तळागाळातील मोठ्या वर्गासाठी ही योजना जीवनदायी ठरली. १३५ कोटींच्या देशातील ८० कोटी लोकसंख्येला या योजनेचा फायदा झाला, जगातील सर्वात मोठी लसीकरण योजना अमलात आणून कोरोनाच्या संकटापासून सुरक्षा प्रदाण त्याच प्रमाणे केली त्यामुळे आज देश आपला सुरक्षीत आहे. आतापर्यंत देशात १ कोटी ९३ लाखापेक्षा जास्ती लस देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भारताचा प्रत्येक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात कायापालट झाला आहे. ही ८ वर्ष मोदी सरकारने फक्त विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी आणि गरीब कल्याणासाठी समर्पित केली आहे. देशामध्ये ‘सबका साथ, सबका विकास सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र घेऊन आज देश सामाजिक, आर्थिक, जागतिक अथवा देशांतर्गत अशा सर्व बाबतीत देश आगेकुच करीत आहे. मोदी सरकारचे ८ वर्ष म्हणजे देशाला लाभलेली एक अनुतपूर्व अशी भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची सेवा. सुशासन आणि गरीब कल्याण यांना ८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेला सर्वाधित करताना खासदार रामदास तडस बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, माजी खासदार अशोक वाघमारे, अविनाश देव, किशोर दिघे , मिलिंद भेंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!