युक्रॉंन हल्याच्या एक दिवस अगोदरच घोराडची डॉक्टर जानवी पोहोचली मायदेशी
सागर राऊत / सेलू :
सेलू तालुक्यातील घोराड येथील रहिवासी तसेच सेलू येथील मेडिकल स्टोरचे संचालक राहुल त्रिवेदी यांची मुलगी डॉ, जानवी राहुल त्रिवेदी युक्रोन येथून एक दिवस अगोदर मायदेशी पोहोचल्याने समाधान व्यक्त करीत असून सोबत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तिथेच अडकल्याची खंत व्यक्त करीत आहे,
कु.जानवी राहुल त्रिवेदी ही युक्रांन मधील राजधानी असलेली कीव येथे ओ. ओ. बोबोमोलेट नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएस एमडी चे शिक्षण घेत आहे, तिचे दोन वर्ष शिक्षणाचे अजून शिलक आहे. रशियाकडून युक्रांद वर काही दिवसात हल्ला होणार याची माहिती भारतीय दूतावासाकडून तीन दिवसा अगोदर युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना पूर्व सूचना देण्यात आल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जसे जमेल तसे मायदेशी पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सदर विद्यार्थिनीने अशीच लगबग करून विमानाची तिकिट मिळवून दुबई गाठली, दुबईहून ती थेट दिल्ली नागपूर असा प्रवास करीत सेलू येथे पोहोचली. परंतु तिच्याच सोबत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मित्र, मैत्रिणी तिथेच अडकून पडल्याची खंत डॉक्टर जान्हवीने व्यक्त केली.
ती युक्रोन मधून सुखरूप मायदेशी सेलू घोराड येथे पोहोचल्याने घरच्या परिवाराने तसेच गावातील नागरिकांनी व चाहत्यांनि गावात पोहोचताच समाधान व्यक्त केले.