युवतीची सतत लग्न करण्याच्या मागणीला कंटाळून युवकांची पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या
मुक्ताईनगर / पंकज तायडे :
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील एका 25 वर्षाच्या युवकांने युवतीची सतत लग्न करण्याच्या मागणीला कंटाळून पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज उघडकिस आली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, अजय सिताराम इंगळे( वय 25) असे मयत युवकाचे नाव असून हा युवक आपल्या परिवारासह उचंदा येथे राहत असून त्याच्या गावातील 28 वर्षीय युवतीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करीत होती. याला अजय याचा साफ नकार होता. मात्र लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून अजयने 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास खामखेडा फुलाच्या पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताचा भाऊ मनोज इंगळे याच्या फिर्यादीवरून तरुणीवर मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.