युवा संघर्ष यात्रेच्या सांगता सभेला नागपूर येथे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी…
हिंगणघाट:- युवा संघर्ष यात्रेच्या सांगता सभेला नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसंवाद यात्रा चालू असून या यात्रेने २२ दिवसात २२२ गावांना भेट दिली आहे.ही यात्रा एक दिवस बंद ठेवून युवा संघर्ष यात्रेच्या सांगता सभेला नागपूर येथे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अंदाजे पाच हजार च्या वर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.पुणे ते नागपूर सुपारे ८०० किलोमीटर युवा संघर्ष यात्रा आमदार रोहित पवार, रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वात युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली.या यात्रेची सांगता सभा नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली.युवक, बेरोजगार, शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे आठशे किलोमीटर प्रवास करून रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचे सांगता सभा नागपूर येथे करण्यात आली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री दिग्विजयसिंह, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, खासदार अमोल कोल्हे,वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत,वर्धा जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे उपस्थित होते.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस तथा नागपूर जिल्हा निरीक्षक अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24