येणी दोडका/स्नेहा कांबळे

वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात सध्या वन्य प्राण्यांची दहशत वाढली आहे. शेतात काम करताना तसेच गुरे चारताना माणसाला आणि गुरांना भीती आहे. अगदीच जंगलाला लागून असणाऱ्या गावांनी पुनर्वसनाची तयारी दाखविली, प्रस्तावही गेले आहेत पण अजून सारे काही थंडबसत्यात आहे. त्यामुळेच येणी दोडका या गावात देखील नागरिक वाघाच्या दहशतीखाली आहेय. बोर व्याघ्र प्रकल्पातील येणी दोडका आणि शेजारील गावात अस्वल,बिबट आणि लांडग्यांपासून सावध राहण्याचा प्रयत्न गावकरी करीत आहेत. बोर व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार झाल्यामुळे कारंजा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश प्रकल्पात झाला आहे. त्यामुळे वाघासह इतर वन्य प्राण्यांची दहशत असल्याने वन विभागाने कारंजा परिसरातील गावांना सतर्क केले खरे पण कायमस्वरूपी अद्याप त्यावर उपाय दिलाच नाही. जंगल क्षेत्रात येणाऱ्या , सिंदी विहिरी, येणी दोडका, मरकसुर, आजनडोह, लिंगा मांडवी,हेटी कुंडी, धमकुंड , गरमसुर आदी गावाजवळ वाघाचा संचार आहेय. हे प्राणी जंगलात जागलीला जाणारे शेतकरी, शेतमजूर, गुरे चारणाऱ्या गुरख्याना क्षती पोहचवू शकतात अशी कायम भीती या परिसरात आहे. त्यामुळे जागलीला जाणाऱ्या तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना समूहाने काम करा तसेच जागलीला देखील समूहाने जा ! असा सल्ला वनविभाग नेहमी देत आला आहे. अस्वल आणि बिबट देखील या परिसरात मुक्त संचार करीत असतात. कमी लोकसंख्येचे गाव असले तरी या गावात आता वाघाच्या भीतीने मुलगी देणे देखील टाळले जात आहे. गावात दुकान नाही चक्की नाही, शाळा आहे ती देखील मस्तराविनाच चालते त्यामुळे गावाच्या अनेक समस्यांसह पुनर्वसनाकडे लक्ष देण्याची मागनी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!