रसुलाबाद-/येथील आज सकाळी रसुलाबाद गावातील अनेक जनावर जंगलामध्ये चारा चरण्यासाठी गेले होते या मध्ये गायी,गाई म्हशी, कालवड,इत्यादी जनावराचा कळफ जंगलात चरण्यासाठी गेले होते आज त्या मधील जवळपास 70 ते 80 जनावर यांना ज्वारी कोंब,चारा खालल्याने चाऱ्यातून विष बाधा झाल्याचे ड्रॉक्टर यांनी सांगितले. तसेच जनावरांमध्ये बिमार पडत असल्याचे माहिती काही पशुपालकांनी रसुलाबाद मधील dr विवेक भबुतकर यांना दिली असता त्यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्या बिमार असलेल्या व विषबाधा झालेल्या जनावरांना त्वरित उपचार सुरू केले व यांची माहिती पशुसंवर्धन विभागातील dr याची माहिती दिली आणि त्यांनी विरुळ रोहना व आर्वी येथील सर्व टीम रसुलाबाद पोहचून अनेक विष बाधित जनावरांचा जीव वाचवला.या मध्ये ड्रॉ रामेश्वर आढावू सह्ययक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु सर्व चिकोत्सलय आर्वी यांच्या उपस्थित तालुक्याचे भरारी पथक वाहनसह यांची टीम उपचार करण्यासाठी रसुलाबाद मधील घटनेच्या ठिकाणी पोहचले या मध्ये ड्रॉ रामेश्वर अढावू, dr अधारे , dr केचे , dr कोहाल्ड यांनी उपचार केले.यावेळी गावातील dr विवेक भबुतकर व डहाके यांचे विशेष मदत केली गावातील अनेक ठिकाणी वरून औषध साठा बोलावण्यात आले होता यावेळी 54 गायी , 9 गोऱ्हे , 13 कालवडी असे एकूण 66 जनावरं उपचार करण्यात आहे आणि सर्वच जनावरांचा यावेळी जीव वाचवण्यात आला.यावेळी गावातील अनेक तरुण मुलांनी व पशु पालकांनी खूप मोलाची मदत केली यावेळी सरपंच सह रसुलाबाद गावातील नागरिकांनी पशुसंवर्धन विभागातील dr व कर्मचारी यांचे आभार मानले वेळीच सर्व विष बाधित जनावरांवर उपचार झाल्याने होणारी दुर्घटना टळली आणि अनेक जनावराचा जीव वाचवण्यात यश आले