राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्य वर्धा येथे 31 मे 2022 रोजी भव्य मिरवणूक
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्धा गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता आली नाही . जिल्हयातील सर्व समाज बांधवाना कळविण्यास आनंद होत आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे . जयंती निमित्य अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास हा संपूर्ण जगात सुप्रसिद्ध आहे . अहिल्यादेवीचे संपूर्ण जीवन चारित्र्य प्रेरणादायी आहे . राजकारण , समाजकारण , अर्थकारण , विकासकारण इत्यादी त्यांनी आपल्या कार्याचा जगावर ठसा उमटविला आहे , त्यांनी केलेल्या कार्याची जनजागृती होण्यासाठी साय , 5 . वस ०० वाजता भव्य मिरवणूकीचे आयोजन केले आहे . या मिरवणुकीत धनगर समाज बंध भगिनी तरुण तरुणीने सहभाग नोंदवावा तसेच तन मन धनाने सहकार्य करावे . असे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती , वर्धा जिल्हाचे वतीने आवाहन केले आहे . या कार्यक्रमाचे उद्घाटक रामदास तडस , खासदार , वर्धा लोकसभा , प्रमुख पाहुणे रमेशजी कोळपे , तहसिलदार , वर्धा , राजेश भगत , मुख्याधिकारी , नगर परिषद , वर्धा , विश्वास सिद , प्रकल्प संचालक , जिल्हा ग्रामीण विकास योजना वर्धा व प्रसन्ना भुजाडे , उपअधिक्षक , भुमी अभिलेख वर्धा हे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहेत . शासन निर्णयाप्रमाणे शासन परिपत्रक दिनांक 31 डिसेंबर 2021 बुसार सन 2022 मध्ये प्रत्येक राष्ट्रपुरूष व व्यक्ती यांची जयंती जिल्हयातील व तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालया मध्ये साजरी होते , त्याच प्रमाणे थोर व्यक्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा सुद्धा शासननिर्णया नुसार सर्व शासकीय कार्यक्रम साजरा करण्यात यावा तसेच जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत शहरातील महानगर पालिका नगर पालिका नगर पंचायत व सर्व शासकीय कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करावी अशी माहिती सुद्धा आयोजित पत्रकार परिषदेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे . तसे निवेदन धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी वर्धा यांना देण्यात आले आहे . तसेच या जयंतीच्या निमित्याने येत्या जून महिण्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात कल्पवृक्ष हॉस्पीटल , नागपूर व धनगर समाज युवक मंडळ वर्धा यांच्या सौजन्याने आरोग्य चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे . या कॅम्पमध्ये लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत मोफत पुर्ण बॉडी चेकअप करणार आहेत . त्या कॅम्पला जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन प्रा. राजू गोरडे, अरुण दाभाडे, रामेश्वर लांडे, दिलीप उपासे, सतिश भोकटे, शशांक हुलके, जितेंद्र गोरडे, जयश्री कोटगिरवार, देवेंद्र टेकाडे, नरेंद्र ढवळे , प्रकाश खुजे, संदीप पुनसे , अनंता पोराटे आदीनी केले आहे .