राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा.
मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी सत्यजित भरणे
गडचिरोली येथे होणार सबज्युनियर बॉलबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
मलकापूर : द महाराष्ट्र बॉलबॅडमिंटन असोसिएशन व गडचिरोली बॉलबॅडमिंटन असोसिएशनचे यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा गडचिरोली येथे दिनांक ६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान सबज्युनिअर राज्यस्तरीय बॉलबडमिटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश महाजन व कार्याध्यक्ष राजेश खगार यांनी नुकतीच केली.
नुकत्याच सपन्न झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा संघ तयार करण्यात आला असून हा संघ लातूर येथील राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी सत्यजित भरणे व मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी येथील कु. समिशा अवचार यांची नियुक्ती संघटनेचे सचिव विजय पळसकर यांनी नुकतीच केली असुन संघ पुढीलप्रमाणे
*मुली संघ*
१)समीक्षा अवचार (कर्णधार)
२) भूमिका घोटकर
३) शिवानी लांदूरकर
४) प्रिया चौधरी
५) सृष्टी वानखडे
६) खुशी श्रीनाथ
७) श्रावणी चव्हाण
८) जानवी इंगोले
९) सृष्टी हिंगणे
१०) मयुरी इंगळे
*मुले संघ*
१) सत्यजित भरणे( कर्णधार)
२) समर्थ ढोले
३) अभिषेक ठोंबरे
४) मोहित अरबट
५) उमेर मलिक
६) वेदांत डिगोळे
७) प्रेम माळी
८) श्रीराज लोड
९) श्रेयश इंगळे
१०) कार्तिक साबळे
निवड झालेल्या दोन्ही जिल्हा संघाचे प्रशिक्षण शिबिर दि २ ऑक्टोबर पासून माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगाव जिल्हा बुलढाणा येथे सुरू होणार असून निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी बॉलबॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांच्याशी संपर्क साधावा असे संघटनेतर्फे आव्हान करण्यात आले आहेत
मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी कु.समिक्षा अवचार
सागर राऊत सहासिक न्यूज -24