राष्ट्रीय ओबीसी मोर्चा द्वारे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

0

 

मुक्ताईनगर / पंकज तायडे:

मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा द्वारे ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी तहसिलदारां मार्फत राष्ट्रपतींना दिले निवेदन देण्यात आले आहे.
१९३१ ला इंग्रजांच्या हातून ओबीसींची जातिनिहाय जनगणना झालेली आहे. त्यावेळेस पासून आत्ता पर्यंत कोणत्याही सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली नाही , मुळात होऊच दिली नाही, या मागचे मुख्य कारण म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी राज्यघटनेमध्ये ३४० कलम नुसार जातिनिहाय जनगणना करून संख्येच्या अनुपात मध्ये आरक्षण देण्यात यावे लिहून ठेवले आहे. परंतु इथल्या मनुवादी सरकारला चांगले ठाऊक आहे, ओबीसीची जातिनिहाय जनगणना केली तर ओबीसी जागृत होऊन प्रश्न विचारले आम्हाला आमच्या संख्येचे अनु पाता मध्ये आरक्षण पाहिजे हे इथल्या राजकारण्यांना नकोय म्हणून केंद्र सरकारने काही दिवसाआधी सुप्रीम कोर्टामध्ये एक हलफनामा सादर केला आहे की २०२२ मध्ये सुद्धा ओबीसींची जाती आधारित जनगणना केली जाणार नाही. ज्यामुळे आतापर्यंत सरकारकडे ओबीसींची कुठलीही आकडेवारी नाही त्यामुळे ओबीसींना विकासापासून आणि योजनांपासून वंचित राहावे लागत आहे . आमचे दुर्भाग्य असे आहे की या देशांमध्ये पशु पक्ष्यांची गणना केली जाते या देशांमध्ये जनावरांची गणना केली जाते एवढेच नव्हे तर या देशांमध्ये हिजड्यांची गणना केली जाते परंतु पिछडयानची केली जात नाही या देशातील ओबीसी समुदायाचे दुर्भाग्य आहे ओबीसींची जातिनिहाय जनगणना लवकरात लवकर करण्यात यावी तसेच तीनही काळे कृषी बिल रद्द करण्यात यावे ईव्हीएम मशीन मध्ये लावलेले पेपर ट्रे ल पावती चे १०० टक्के मोजणी झाली पाहिजे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले, निवेदन देतेवेळी बहुजन मुक्ती पार्टी रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे. बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर .राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे इरफान बागवान. लहुजी क्रांती मोर्चा चे राजेश ढगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन भाऊ सोनवणे, दीपक भाऊ खुळे , .शिवसेनेचे विशाल नारखेडे , प्रमोद सोनार , अँड. मनोहर खैरनार, बहुजन क्रांती मोर्चा चे राजू कोळी, भगवान कवरे , .देवलाल तांबे, राष्ट्रपाल धुरंधर , .रवी हिरोळे , संजय पाटील , .हिरामण कोळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!