शहीद आष्टी : येथील रेती चोरीच्या प्रकरणात तळेगाव व आष्टी पोलिसांची कार्यवाही संदिग्ध भूमिकेत असल्याने शासनाला व महसूल विभागाला लाखो रुपयाचा महसूल डुबत आहे.माहितीप्रमाणे तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने व कोणत्याही प्रकारचे तालुक्यात डेपो सुरू न झाल्याने रेती माफियांचा कारभार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यामध्ये पोलिसांच्या हात मिळविणे मुळे शासनाच्या तिजोरीला चुना लावण्यात येत आहे.काही महिन्या अगोदर पोलिसांनी रेतीचा ट्रॅक्टर पकडला तर ट्रॅक्टर जप्त करून त्याबाबत तहसीलदार यांना कळवून त्याचे विरुद्ध तहसील कार्यालयातून दंडात्मक कारवाई केल्या जात होती व त्यामध्ये एक लाख तीस हजार रुपये दंड ट्रॅक्टर मालकावर लावून आकारण्यात येत होते परंतु पोलीस व रेती माफिया नी महसूल डुबविण्याकरिता यामधून दुसरा मार्ग काढल्याने पोलिसांना प्रत्येक ट्रॅक्टर चोरी प्रकरणात ५० हजार रुपये फौजदारी न्यायालयातून सुप्रीत नामा घेण्याकरिता फक्त ५ हजार असे ५५ हजार रुपये मध्ये प्रकरणाचा निपटारा करण्यात येत आहे या अगोदर महसूल व पोलीस गुन्हे अशी कारवाई होत असल्याने रेतीमाफी यांचे धाबे दणाणले होते तळेगाव पोलीस ठाणे मध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पानतावने यांचे रेतीमाफियाना पाठराखंन असल्याने सांगण्यात येते