लोकसहभागा तून पवनार येथील केदोबा पाधन रस्त्याचा श्रीगणेशा

0

प्रतिनीधी/पवनार

      वर्धा तालुक्यात लोकसहभागातून पांधण रस्ते व शिवपाधन रस्ते उभारणीला सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला वहीवाटीचा प्रश्न यातून मार्गी लागणार आहे. वर्धा तालुक्यातील पवनार येथील एम.आय.डि.सी. पाणीपुरवठा योजनेच्या रोड पासून ते केदोबा पठार नाल्यापर्यंत जवळपास तीन (३) किलोमीटर केदोबा पांदन रस्त्याचे मातीकाम व खडीकरण कामाचे भूमिपूजन तहसीलदार वर्धा रमेश कोळपे व नायब तहसीलदार बाळूबाई भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजस्व अभियान व महाराष्ट्र सरकारच्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाधण रस्ते योजने द्वारे सर्वत्र राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. याच अभियाना अंतर्गत वर्धा तालुक्यातील मौजा पवनार ते मौदा केदारवाडी हा तीन किलोमीटर केदोबा पाधण रस्ता मोकळा करून, त्याचे मातीकाम व खडीकरण करण्याच्या प्रत्येक कामाला सुरुवात करून श्रीगणेशा करण्यात आला. सदर केदोबाची पाधान या नावाने प्रचलित असणाऱ्या पांदन रस्त्याचे लोकसहभागातून मातीकाम व खडीकरण करण्याचे भूमिपूजन पार पडले. तहसीलदार रमेश कोळपे यांनी मंडलाधिकारी व तलाठी यांना आपापल्या मंडळात शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी काढण्यासाठी म्हणून लोकसहभागातून पाधन रस्ते व शेत शिव पाधन रस्ते निर्मितीची माहिती देत या उपक्रमाचा पाया रचला. पांदन रस्त्याचे मोजमाप करीत रस्ता मोकळा करून मोक्यावर अतिक्रमणाचा निपटारा करून देण्याचे काम उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हाधिकारी विभाग वर्धा, तहसील महसूल विभाग वर्धा, यांच्यामुळे या मोहिमेला गती आलेली आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील स्त्याचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून तहसील कार्यालयात संपर्क साधत लोकसहभागातून पाधण रस्ते व शेतशिव पादन रस्ते निर्माण करून घ्यावे. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, ना. त. बाळूबाई भागवत, मंडल अधिकारी शैलेश देशमुख, पवनार साझ्याचे तलाठी आशिष सहारे, इतर साझ्याचे उपस्थित तलाठी यशवंत लडके, बाळूप्रसाद ढोणे, मधुकर गेडाम, मीनाक्षी उइके भाग्यश्री तळवेकर, अर्चना गिरडकर ,राजेश थाममंकर, मंगेश ठमके, लीलाधर खवास, देवेंद्र नेहारे. तसेच पवनार येथील निळकंठ हिवरे, सुरेश हिवरे, जगदीश वाघमारे, मुरलीधर वैद्य, संजय वैद्य, दामोदर हिवरे, गणेश हिवरे, प्रकाश चोंदे, रंजना आंबटकर, सुरज वैद्य, प्रमोद आंबटकर, सचिन उराडे, महेश गोमासे, प्रशांत गोमासे,सह परिसर तील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!