वघाळा -तुळजापूर चौकात रस्ते बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / सेलू :
तालुक्यातील सेवाग्राम हमदापूर मार्गावर वघाळा तुळजापूर हे गाव सात कि.मी.अंतरावर असून या मार्गाचे काम बऱ्याच वर्षापासून संत गतीने सुरू असून सप्ताहात सिमेंट रोड कामाला वेग आला आहे. आज घडीला सिमेंट रोडचे व माती काम वघाळा-तुळजापूर चौका पर्यंत आले आहे.
दैनंदिन रस्ते कामानिमित्त वाहने चौकातून सुसाट वेगात धावत असून अशात प्रचंड धूळ उडून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वेगाने वाहून चालून अपघात होऊ शकतो. अशा पुर्व सुचना देऊनही संबंधित चालक ऐकत नाही , असे ग्रामस्थांच्या तोंडून ऐकवत आहे. आज अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतली.
या ठिकाणी चौक असल्याने टाकळी (किटे), वघाळा ,तुळजापूर ,जयपूर, खरांगणा (गोडे) येथील नागरिक दैनंदिन ये-जा करीत असून येथे नागरीकांची प्रचंड वर्दळ असते.
रस्ते बांधकाम विभागाने लक्ष देत दिवसातून दोन वेळा रोडवर पाणी टाकावे. वाहन वाहतूक हळूवार चालवावी . मार्गाचे काम तातडीने पुर्ण करावे. असी मागणी येथील निलेश जाधव. सचिन ढोबळे.सुरेश लढी.गौरव हाते.बापू तुराळे,प्रसन्ना चरडे व ग्रामस्थांनी केली आहे.
दुकाने पानटपऱ्या हटवीणार
सेवाग्राम ते हमदापूर मार्गाने गावाच्या हद्दीत ग्रामस्थांनी चौकात दुकाने, पानटपऱ्या थाटून उदरनिर्वाह करीत आहे. रस्ते विभागाचे वतीने रस्ताचे कामकाज गावापर्यंत आले आहे. दुकान व पानटपऱ्या रस्ते बांधकाम विभागाच्या वतीने नोटीस देऊन पुर्व सुचित करणार असे विभागाचे वतीने आज सांगण्यात आले.