प्रतिनिधी / वडनेर :

वडनेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र. २ व वार्ड क्र. ३ मध्ये सिमेंट नाली बांधकाम व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्राम पंचायत वडनेर येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत गावात नागरी सुविधा करिता २५ लक्ष रुपये प्रशासकीय व तांत्रिक मंजूर प्राप्त झालेली असून वडनेर गावात विकास कामाला प्रारंभ झाला आहे. वार्ड क्र.२ मधील सुरेश भोयर ते नागमंदिर पर्यंत सिमेंट नाली बांधकाम प्राकलन किमंत १.८० लक्ष व वार्ड क्र. ३ मधील तुकडोजी प्रार्थना मंदिर ते वैतागे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम प्राकलन किमंत १.८० लक्ष तसेच वार्ड क्र. ३ मधील महादेव मंदिर परिसराचे सौनर्दयीकरण व सिमेंट रस्ता बांधकाम प्राकलन किमंत १.० लक्ष रुपये,
वडनेर गावातील विविध विकास कामाचे भूमिपूजन सरपंच कविता विनोद वानखेडे व विनोद वानखेडे माजी सरपंच तथा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
विविध विकास कामाचे भूमिपूजन सुभाष शिंदे उपसरपंच, वर्षा भोयर ग्रा.पं. सदस्य, सोनाली शिंदे, आरिफ शेख ग्रा.पं. सदस्य, बबनआंबटकर ग्रा.पं. सदस्य, दशरथ दुर्गे माजी उपसरपंच , राजेंद्र भोरे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ हिंगणघाट, कृष्णा महाजन अध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था, वाच्छला वैतागे माजी ग्रा.पं. सदस्य, हेमंत वैतागे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पादाधिकारी, विशाल दिवे, संजय मांगरूटकर, प्रवीण गुजरकर, दिलीप दांडेकर, अध्यक्ष महादेव मंदिर, सुनील कळसकर यांचे प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.
भूमिपूजन सोहळ्याला मोहन लोहकरे, घनश्याम भगत, विनोद मांगरूटकर, शंकरराव सुरकार, शंकरराव गेडेकर, बाबाराव फाटे, अण्णाजी शेळके, मारोतराव शेळके, प्रभाकरराव धात्रक, वसंतराव हिवरकर, राजू चौधरी, निखील देवतळे, जनार्धन शिंदे, बाबाराव शिंदे, दिनकरराव शिंदे, एकनाथ उमाटे, किशोर वैतागे, ईश्वरराव उमाटे, अशोकराव दिवे, अजय मेहरकुरे, वसंता सोनटक्के, विनोद दिवे, शंकर वाटमोडे, आनंद मानकर, सुनील खोडे, शरद लाखे, ज्ञानेश्वर चंदनखेडे, व वडनेर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. गावात संपूर्ण विकास कामांना प्रारंभ झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!