वर्धा उपविभागीय अधिकारी “पियुष जगताप” यांनी 420 पणा करणाऱ्या “विभा गुप्ता” कडून 25 लाख रुपयांची लाच घेऊन महारोगी सेवा समितीच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण
Byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
स्थानिक दत्तपूर येथील महारोगी सेवा समिती मध्ये मागील सहा वर्षांपासून गांधीजी, विनोबा भावे यांच्या नावावर स्वतःची दुकानदारी करणारी 420 विभा गुप्ता व व्यवस्थापक डॉ. रामजी शुक्ला यांचा न्यायालयीन वाद सुरू आहे. मा उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी व्यवस्थापक डॉ. रामजी शुक्ला यांच्या कामात अडथळा आणू नये असा स्पष्ट आदेश दिला. असून प्रशासनाने डॉ. रामजी शुक्ला यांना संरक्षण प्रदान करावे असा आदेश न्यायालयाचा असताना वर्धा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी दिनांक 10 जून 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता च्या सुमारास महारोगी सेवा समिती मध्ये जाऊन तेथील गेटवरील शिपाई यांना मारहाण करून सेवाग्राम पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले , तसेच सोबत विभा गुप्ता, मालती देशमुख, करुणा फुटाणे यांना महारोगी सेवा समिती मध्ये सोबत घेऊन गेले आणि तेथील व्यवस्थापक डॉ. रामजी शुक्ला यांच्या ऑफिस चे कुलूप मालती देशमुख यांनी कटर मशीन नी डीवायएसपी जगताप यांच्या समोर तोडले मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना डीवायएसपी जगताप यांनी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सेवाग्राम ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांना विश्वासात न घेता पियूष जगताप यांनी 420 पणा करण्यात पटाईत असलेल्या विभा गुप्ता कडून 25 लाख रुपयांची लाच घेतल्याची कबुली मालती देशमुख यांनी महारोगी सेवा समितीच्या कर्मचाऱ्यांना समोर बोलून दाखविली . सदरची रक्कम डीवायएसपी जगताप यांच्या “पत्नी” च्या माध्यमातून ‘विभा’ ची सहकारी मालती देशमुख यांच्या माध्यमातून स्विकारली आहे. याच मुळे दिनांक 10 जून 2022 रोजी महारोगी सेवा समिती मध्ये रात्री 7:30 वाजता च्या सुमारास जाऊन मोठा आवाज करून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली, तर सारिका नावाच्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली , तेथील कर्मचारी यांना मारहाण करण्याचा अधिकार डिवायएसपी जगताप यांना कोणी दिला.रक्कम प्राप्त होतात जगताप यांच्या अंगात खाकी वर्दीची गर्मी उफाळून आली आहे . तसेच तेथील व्यवस्थापक डॉक्टर रामजी शुक्ला यांना सुद्धा फोन करून जगताप यांनी धमकी देऊन कारवाई करण्याची ताकिद दिली . महारोगी सेवा समिती परिसरात 420 विभा गुप्ता यांना व त्यांच्या सहकार्यांना महारोगी सेवा समिती मध्ये प्रवेश करण्यास माननीय उच्च न्यायालयाने मनाई केली असे असतांना डीवायएसपी जगताप यांनी खाकी वर्दीतील गुंड बनवून विभा गुप्ता यांच्या सहकाऱ्याला प्रवेश दिला तर डॉक्टर राजीव शुक्ला यांनी कामावर रुजू केलेल्या कर्मचारी यांना मारहाण करून हाकलून दिले. व विभा गुप्ता च्या सहकाऱ्यांना प्रवेश दिला , तसेच तेथील कार्यालय गोडाऊन तसेच मुख्य गेटचे कुलूप कटर मशीन नी तोडण्याचे कार्य जगताप यांनी केले.