वर्धा जिल्हाधिकारी AC गायब प्रकरण;AC गायब करणारा चिंधी चोर ? अधिकारी कोण?
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील 2 लाख किमतीचा AC जिल्हाधिकारी कार्यालयातून गायब झाल्याच्या चर्चेने खळबळ निर्माण झाली आहेय. 2018 मध्ये प्रशासनाने 8 लाख किंमतीचे चार AC घेतले होते. सुरुवातीच्या काळात हे चारही AC जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही बैठक सभागृहात लावण्यात आले होतेय.मात्र आता बैठक सभागृहात दोन आणि महाआयटी विभागात एक असे तीनच AC येथे दिसून येत आहेय.. त्यामुळे चर्चेला मोठे उधाण आले आहेय.. भ्रमणध्वनी वरून मात्र याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मोरे यांना AC बद्दल माहिती विचारले असता बरं.. बरं… तुमच्याशी थोडा वेळात नंतर बोलते. असे सांगून टाळाटाळ करण्यात आली आहेय.. मात्र या प्रकाराबद्दल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील AC गायब झाल्याने खळबळ माजली आहेय.. कार्यालयातील AC गायब करणारा चिंधी चोर ? अधिकारी कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.जिल्हाधिकारी राहुल कर्डीले येताच अनेक प्रकरणात अधिकारी आपल्या मनमर्जीने काम करीत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर काही अधिकारी नको तो त्रास खालील कर्मचाऱ्यांना देत असल्याचे कर्मचारी यांनी साहसिक ला तोंडी सांगितले आहेय..त्यामुळे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात नेमके चालले तरी काय? हे समजण्याच्या पलीकडे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कर्डीले यांनी या अधिकाऱ्यांना आवरा आणि शासनाच्या मालमत्तेवर आपला अधिकार गाजविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन चोरीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.
एका अधिकाऱ्याचा मनमर्जी कारभार?
वर्धा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या एक तलाठी मारतोय गुलाटी अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे मात्र त्यात तलाठ्याने प्रोटोकॉल चुकला होता त्यामुळे या तलठ्याची तत्काळ बदली झाली होती जिल्हाधिकारी यांची बदली होतात त्याला पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीय साहायक म्हणून बदली करण्यात आली मात्र ही बदली जिल्हाधिकारी यांना माहीत आहे का? असा सवाल उपस्थित झाला. मात्र हा तलाठी कोणाच्या आदेशाने कार्यालयात आला याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. एकच तलाठी वर्षानुवर्ष येथे का आहे आणि तो विशेष कोणत्या कामासाठी येथे आला? दुसरा तलाठी येथे ते काम करू शकत नाही का? या तलाठ्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने मनमर्जी करून याला येथे आणले याचा शोध जिल्हाधिकारी राहुल कर्डिले घेणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.