वर्धा जिल्ह्यातील ४० कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई
वर्धा / रोहित खोडे
एसटी कर्मचाऱ्याचा राज्यात सुरु असलेल्या संपामुळे सरकारने निलंबनाचे आदेश काढले आहते .यात संपूर्ण राज्यात ३७६ तर एकट्या वर्धा जिल्ह्यातील ४० कर्मचाऱ्यांना निलंबनाचे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी वर्धेत तसेच राज्यात अनेक ठिकाणी बेमुदत संप सुरू आहे .या संपात फूट पडावी या करिता सपूर्ण राज्यात ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात दिले.. यामध्ये वर्धा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून वर्धा जिल्ह्यातील ४० कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे ज्यात वर्धा आगार व हिगणघाट आगाराचा समावेश आहे.