वर्धा जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत जवळपास 77 टक्के मतदान
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्धा जिल्ह्यात आज चार नगरपंचयातची निवडणूक पार पडली..यामध्ये आष्टी,कारंजा घाडगे,सेलू,समुद्रपूर या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाल्या असून या चारही नगरपंचायत मध्ये 54 जागेसाठी 223 उमेदवार रिंगणात होते…28 हजार 833 मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावणार होते…त्यापैकी 77 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्यासाठी 55 मतदान केंद्र नेमण्यात आले होते…