वर्धा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेली पर्स तक्रारदारास परत

0

वर्धा/क्राईम प्रतिनीधी

निलेश गंगाधर महाले नागपूर यांनी वर्धा शहर पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली की नागपूर ते वर्धा दरम्यान बस मध्ये त्यांची पर्स हरवली असून सदर पर्स मध्ये त्यांचा vivo कंपनीचा मोबाईल किंमत 25000 रू 1800 रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आहेत. तक्रारदार यांचा मोबाईल चालू असल्याने सायबर सेल च्या मदतीने तात्काळ सदर मोबाईल चे लोकेशन घेतले असता ते चालू बसमध्ये वर्धा ते नागपूर दरम्यान केळझर येथे दिसून आल्याने तात्काळ सेलु पोलीस ठाणे येथे संपर्क साधून सेलु वाहतूक शाखेचे धनराज सयाम यांच्या मदतीने सदरची बस थांबवून बस ची पाहणी केली असता सदरची पर्स हि बस मध्ये मिळुन आल्याने तक्रारदारांना देण्यात आली. सदरची कामगिरी पोनी सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश बैरागी, पोशी पवन निलेकर पो स्टे वर्धा शहर नापोशी 1286 धनराज सयाम शेलु तसेच पोस्टे सायबर सेल चे नापोशी दिनेश बोथकर यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!