वर्धा पोलिस बाँईज तर्फे २६/११ हल्ल्यात शहीद पोलिस विराना श्रध्दांजली

0

 

शहर प्रतिनिधी / वर्धा

पोलीस बाॅईज असोसिएशन सलग्नीत महिला आघाडी च्या वतीने वर्धा शहरात डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ २६/११ ला मुंबई येथे झालेल्या आतंकी हल्यात शहिद पोलीस विरांना श्रद्धांजी व संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप याच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व शहिदांना बॅडचे धुन वाजवुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नागपुरचे आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शहिदांची प्रतीकृती , संवीधानची रांगोळी व बँडची धुन हे विषेश आकर्षण होते, शहरात विविध ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलीसांना एक गुलाब पुष्प देऊन धन्यवाद दिले. सर्वप्रथम बुद्धांश ढोणे नी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांना पुष्प देउन धन्यवाद दिले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी
वर्षा मारबदे, ललीता कुकडे,प्रतीभा ढोणे, मनिषा ढोणे, गंगा चव्हाण, वंदना नगराळे, आदीती ढोणे, तृप्ती मारबदे, अधिरा ढोणे,आयशा ढोणे, बुद्धांश ढोणे,आशीष कावळे, सुशांत खडसे,अमोल चन्ने, महेंद्र ढोणे याचे सहकार्य लाभले , या कार्यक्रमाचे आयोजन किशोर ढोणे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!