वर्ध्यातील म्हाताऱ्यानं ‘न्हाली नव’ लाखात गंगा
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा;
तालुक्यातील चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी आलेल्या ज्ञानेश्वर भागवत (66) रा. सेलसुरा या वृद्धाच्या शर्टच्या खिश्यातून एटीएम कार्ड चोरून एमटीएममधून 9 लाख 54 हजार 693 रुपये काढण्यात आले. खात्यातून पैसे काढल्याचे लक्षात येताच देवळी पोलिसात तक़्रार दाखल करण्यात आली. ही घटना 21 रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलसुरा येथील ज्ञानेश्वर भागवत 9 रोजी येथील चंद्रभागा नदीवर स्नान करण्यासाठी आले होते. आंघोळी पुर्वी त्यांनी कपडे नदीकाठावरील ओट्यावर काढून ठेवले. स्नान करून आल्यानंतर शर्टच्या शिश्यातून पैशांचे पॉकेट व भ्रमणध्वनी चोरी गेल्याचे लक्षात आले. पैसे चोरी जाण्यापूर्वी त्यांच्या खात्यात 45 लाख 63 हजार 395 रुपये होते. शंका आल्याने ते बँकेत चौकशी करण्यासाठी गेले असता खात्यात 36 लाख 50 हजार 814 रुपये असल्याचे लक्षात येताच त्यांनी देवळी पोलिसात बुधवार 21 रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.