वर्ध्यात काकूवर केला पुतण्याने बलात्कार : पोलिसांत गुन्हा दाखल
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्धा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घडली आहे. वर्ध्यातील दहेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली आहे. शेतात निंदणाचे काम करणाऱ्या काकूवर तिच्याच पुतण्याने अत्याचार केला आहे. याप्रकरणी दहेगाव पोलिसांनी आरोपी पुतण्यास अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ४५ वर्षीय महिला व तिचे जावई हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेतात पिकाला निंदण करीत होते. दुपारच्या सुमारास शेतात निंदणाचे काम केल्यावर जावई घरी जेवण करण्यास निघून गेले. पीडित महिला शेतात एकटीच होती. दरम्यान वासनांध पुतण्याने शेतात प्रवेश करुन काकूशी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. काकूने हटकले असता पुतण्याने बळजबरीने काकूवर अत्याचार केला. घाबरलेल्या काकूने पळ काढून ही घटना तिने सासऱ्यांला सांगितली. मात्र, तोपर्यंत आरोपी पुतण्याने तेथून पसार झाला होता. पीडितेने दहेगाव पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ अत्याचाराच्या कलमान्वये आरोपी पुतण्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीसांनी आरोपी पुतण्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.व पोलिस ठाण्यात आणून अटक केली .