1.  पोत्यात भरून रस्त्यावर फेकला मृतदेह

 

क्राईम प्रतिनिधी / वर्धा

 

वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) येथील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास नागरिकांना पोत्यात बांधून असलेला मृतदेह आढळून आला. पोत्याचा काही भाग फाटला असल्याने हा मृतदेह नागरिकांना दिसून आलाय. असा रहस्यमय रित्या मृतदेह आढळून आल्याने आष्टी शहरात खळबळ उडाली. मृतदेह बांधकाम मजुराचा असून त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा केला जात आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मृतकाच्या घरापासून अगदी 50 मीटर अंतरावर पोत्यात भरून मृतदेह फेकण्यात आला आहेय. घातपात करीत मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहेय. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून दूर फेकण्यासाठीचा प्रयत्न झालाय. पण वजन जास्त असल्याने मध्येच ठेऊन पळ काढला असावा असा कयास लावला जात आहेय. मृतकाचे नाव जगदीश भानुदास देशमुख असे आहे. जगदीश हा गवंडी कामगार असून अतिमद्यप्राशन असल्याने घरातही वादविवाद करत असल्याची माहिती आहेय.नेमकी हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली असावी हे पोलीस तपासात समोर येणार आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असून नागरिकांत तर्कवितर्क काढले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!